9 Sep Current Affairs

9 Sep Current Affairs
9 Sep Current Affairs

जैश च्या मसूदला पाकनं जेलमधून गुपचूप सोडलं

 • जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्ताननं भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. 
 • त्यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याच्यासह अन्य एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याची तुरुंगातून गुपचूप सुटका केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात सरकारला माहिती दिली आहे.
 • गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतानं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्याविरोधात पाकिस्तान येणाऱ्या काळात सियालकोट-जम्मू आणि राजस्थानमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत आहे. 
 • पाकिस्तानच्या याच कटाचा एक भाग म्हणून राजस्थान सीमेजवळ अतिरिक्त पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात येत आहेत. यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी सरकारला अॅलर्ट केलं आहे. 
 • तसंच भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची तुरुंगातून गुप्तपणे सुटका केली आहे.
 • गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांबाबत सतर्कही केलं आहे.
   

विक्रम लँडर सुखरूप इस्रो कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू

 • चांद्रयान-२ च्या संदर्भात एक आनंदाची बातमी इस्रोने दिली आहे. या मोहिमेंतर्गत काम करणाऱ्या इस्रोच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ उभा आहे. त्याचं नुकसान झालेलं नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरकं उभं आहे.
 • या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'विक्रमने हार्ड लँडिंग केली आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार कळतं की विक्रम नियोजित स्थळाजवळ उभं आहे. ते तुटलेलं नाही.'

संपर्काची ६० ते ७० टक्के शक्यता : माजी इस्रो प्रमुख:-

 • इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी ही माहिती मिळाल्यानंतर सांगितलं की विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याची अजूनही ६० ते ७० टक्के शक्यता आहे. 'टाइम्स नाउ'शी बोलताना त्यांनी ही शक्यता वर्तवली.

आतापर्यंतची स्थिती चांगली : इस्रोचे अधिकारी:-

 • इस्रोच्या अन्य एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणं कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 
 • ते म्हणाले, 'आम्हाला जियोस्टेशनरी ऑर्बिटमध्ये हरवलेलं एक स्पेसक्राफ्ट शोधण्याचा अनुभव आहे. पण विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. तेथे तशी ऑपरेशन फ्लेक्झिबिलीटी नसल्याने आम्ही त्याला जागेवरून हलवू शकत नाही. जर त्याच्या अँटिनाची दिशा ग्राउंड स्टेशन किंवा ऑर्बिटरकडे असेल तर आमचं काम सोपं होईल.' विक्रम ऊर्जा वापरत आहे, मात्र त्यावर सौर पॅनल लावल्याने त्याची चिंता नाही.
   
9 Sep Current Affairs
9 Sep Current Affairs

रोहित शर्माची रोहित4राईनोज मोहीम

 • प्रसिद्ध एकशिंगी गेंडा (Greater One-Horned Rhinoceros) किंवा भारतीय गेंडा या धोक्यात असलेल्या प्राणी-प्रजातीच्या संवर्धनार्थ जागरूकता वाढवण्यासाठी भारतीय फलंदाज रोहित शर्मा ह्याने WWF इंडिया आणि अॅनिमल प्लॅनेट या संस्थांच्या भागीदारीने 'रोहित4राईनोज' मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
 • यदा 22 सप्टेंबर रोजी पाळण्यात येणार्‍या जागतिक गेंडा दिनाचे औचित्य साधून अ‍ॅनिमल प्लॅनेट या दूरदर्शन वाहिनीवर सुरू करण्यात आलेल्या मोहिमेमध्ये  रोहित शर्माने "असुरक्षित" प्रजातींचा नाश होण्यापासून बचाव करण्यासाठी कार्य करण्याचे वचन दिले.
 • आज जगात अंदाजे 500 एकशिंगी गेंडे शिल्लकआहेत, त्यापैकी 82 टक्के भारतात आढळतात.  
 • एकशिंगी गेंडा हा आसाम राज्याचा राज्य पशू आहे. गेंडा हा सस्तन प्राणी पूर्व आशिया आणि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील गवताळ, दाट झुडपं व अरण्यांमध्ये आढळून येतो.

गेंडय़ाच्या पाच जाती जिवंत आहेत : दोन एकाच वंशातील आणि बाकीच्या तीन वेगवेगळ्या वंशातील आहेत.
१)    मोठा भारतीय गेंडा:–  
हा पश्चिम बंगाल, आसाम आणि नेपाळमध्ये आढळतो. शास्त्रीय नाव रिहनोसेरॉस यूनिकॉर्निस. सर्वात मोठय़ा गेंडय़ांपैकी हा एक आहे. त्याची डोक्यासहित लांबी दोन ते चार मीटर तर सरासरी उंची एक ते दोन मीटर असते. त्याला एकच शिंग असतं. त्वचा जाड असून तिच्यावर केस नसतात, पण गुठळ्या असतात.गेंडा एकलकोंडय़ा स्वभावाचा आहे. गवत याचं मुख्य अन्न होय. श्राद्धाच्या दिवशी गेंडय़ाच्या शिंगाच्या पेल्यातून अघ्र्य देणं पवित्र मानतात. गेंडय़ाचं मूत्र जंतूनाशक असतं अशीही समजूत आहे. अशाच अनेक समजुती ब्रह्मदेश, सयाम आणि चीनमध्ये प्रचलित आहेत. या प्राण्याच्या बेसुमार हत्येचं, हेही एक कारण आहे.
२)    जावा गेंडा:– 
याचं शास्त्रीय नाव रिहनोसेरॉस सोंडेइकस. हा भारतीय गेंडय़ापेक्षा लहान असून फक्त नरालाच शिंग असतं. त्याची उंची १.८ मीटर असते. त्वचेवर खवल्यांसारख्या लहान बहुकोनी चकत्या असतात.
३)    आशियातील दोनशिंगी गेंडा:– 
शास्त्रीय नाव डायडमोंसेरस सुमात्रेन्सिस. जिवंत गेंड्यामध्ये सगळ्यात लहान. आसामच्या डोंगराळ दाट अरण्यात हा क्वचित आढळतो. ब्रह्मदेशातही हा गेंडा थोड्या प्रमाणात आढळतो. गेंडा सयाम, मलाया व सुमात्रातही तो आढळतो. याची उंची १-१.५ मीटर असते. याला एकामागे एक अशी दोन शिंग असतात. त्वचेवर केस व वळ्या असतात.
४)    आफ्रिकेतील ‘काळा गेंडा’:– 
शास्त्रीय नाव डायसेरॉस बायकॉर्निस. तो पुर्व व दक्षिण आफ्रिकेत आढळतो. याची उंची सु. १.५ मीटर असते. याला एकामागे एक अशी दोन मोठी शिंगं असून क्वचित मागच्या शिंगाच्या मागे तिसऱ्या शिंगाचा अंकुर आढळतो. हा तापट आणि आक्रमक वृत्तीचा असून माणसं व वाहनं यांवर हल्ला चढवतो. सोमाली लोक याच्या कातडय़ाच्या ढाली करतात.
५)    आफ्रिकेतील ‘पांढरा गेंडा’:– 
शास्त्रीय नाव सेरॅटोथेरियम सायमम. तो हत्तीच्या खालोखाल मोठा असून याची उंची १.५-२ मीटर असते, तर लांबी ३.५-५ मीटर असते. याला दोन शिंगं असून पुढचं मागल्यापेक्षा बरंच मोठं असतं. पुढच्या शिंगाची लांबी १८० सेंमी. पर्यंत मागच्या शिंगाची ४० सेंमी.पर्यंत असते. त्याचा रंग पिवळसर बदामी असून अंगावर केस नसतात. हा हल्ली दक्षिण सुदान, युगांडा त्याच्या लगतच्या कांगोचा भाग आणि झुलुलँडची राखीव जंगलं इथं आढळतो.
 

साहिर लुधियानवी यांची शब्दरत्ने मुंबईतील भंगाराच्या दुकानात

 • प्रख्यात उर्दू कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, रोजनिशी, कविता आणि कृष्णधवल छायाचित्रे असा अनमोल ठेवा मुंबईतील एका भंगाराच्या दुकानात सापडला! त्याचे जतन करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने तो केवळ तीन हजार रुपयांमध्ये खरेदी केला आहे.
 • मुंबईतील ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ या ना नफा- ना तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थेला जुहूच्या एका भंगार दुकानात वर्तमानपत्रे आणि मासिकांच्या ढिगाऱ्यात साहिरची शब्दरत्ने गवसली. त्यांचे जतन करून ते प्रदर्शित करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
 • आपण गाण्यांच्या ध्वनीमुद्रणासाठी कुठे जाणार आहोत यांसारख्या दिनक्रमातील बाबी आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचे तपशील साहिर यांच्या रद्दीत सापडलेल्या रोजनिशांमध्ये आहेत. याशिवाय साहिर यांच्या हस्ताक्षरातील अनेक कविता आणि नोंदीही त्यात आहेत. या नोंदी ‘परछाईयाँ’ या त्यांच्या प्रकाशनगृहाशी संबंधित आहेत, असे फिल्म हेरिटेज फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांनी सांगितले.
 • साहिर यांनी संगीतकार रवी, त्यांचे मित्र आणि कवी हरबन्स यांच्यासारख्या प्रख्यात विभूतींना लिहिलेली पत्रेही या संग्रहात आहेत. काही इंग्रजीत, तर काही उर्दूत आहेत. उर्वरित सर्व साहित्य उर्दूत आहे, असे डुंगरपूर यांनी सांगितले.
 • साहिर यांची काही वैयक्तिक, काही बहिणी आणि मित्रांसोबतची, तर काही त्यांच्या पंजाबमधील घराची छायाचित्रेही रद्दीत सापडलेल्या या ठेव्यात आहेत. संस्थेचे तज्ज्ञ साहिर यांच्या कुठल्या कविता अप्रकाशित आहेत, याचा शोध घेत आहेत. या प्रख्यात कवीचे मौल्यवान साहित्य मुंबईच्या एका गल्लीतील भंगाराच्या दुकानात सापडणे यासारखी दु:खदायक घटना नाही.

दु:खदायक योगायोग:-

 • आपल्या कविता प्रसिद्ध करण्यासाठी धडपडणारा आणि नकाराचे धक्के खाणारा विजय हा गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ या अभिजात चित्रपटाचा नायक. त्याच्याही कविता एका भंगाराच्या दुकानात सापडतात, असा प्रसंग चित्रपटात आहे. या चित्रपटाचे गीतकार साहिर यांचे साहित्य रद्दीत सापडणे हा दु:खदायक योगायोग आहे. या १९५७च्या चित्रपटातील अनेक दृश्ये साहिर यांच्या आयुष्यावर बेतलेली होती.
9 Sep Current Affairs
9 Sep Current Affairs

कमला हॅरिस यांचा माफीनामा

 • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याला हसून दाद दिल्याबद्दल भारतीय वंशाच्या अमेरिकन सिनेटर कमला हॅरिस यांनी रविवारी जाहीर माफी मागितली. न्यू हॅम्पशायरमधील टाउन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात एका भारतीय व्यक्तीने 'ट्रम्प यांचे कार्यक्रम व कृती मतिमंद आहेत', अशी टिप्पणी केली होती. त्यावर डेमोक्रेटिक पक्षाच्या कॅलिफोर्नियामधील सिनेटर असणाऱ्या ५४ वर्षीय हॅरिस यांनी हसून 'योग्य बोललात', अशी दाद दिली होती.
 • या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॅरिस यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. त्यावर 'मला त्या वेळी संबंधित व्यक्तीने केलेली टिप्पणी ऐकूच आली नव्हती', अशी सारवासारव हॅरिस यांनी केली. 'या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी अस्वस्थ झाले. 
 • मी त्यांना वेळीच थांबवायला आणि दुरुस्त करायला हवे होते. मी माफी मागते. ते व त्यासारखे अन्य शब्द कधीही अस्वीकारार्हच आहेत', असे हॅरिस म्हणाल्या.
 • पुढील वर्षी होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रेटिक पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी हॅरिस इच्छुक आहेत.

(त्या भारतीय वंशाच्या असल्याने लक्षात ठेवा, विचाराल तर इतकेच विचारू शकतात.)
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »