भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद

भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद
भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद

पाकची खुमखुमी

  • काश्मीरसंदर्भात अत्यंत अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने त्याची हवाई हद्द भारतीय विमानांना बंद करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी मंगळवारी दिली. 
  • याबरोबरच भारत व अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारासाठी वापरला जाणारा पाकिस्तानचा भूमार्गही पाकिस्तान रोखणार आहे. हे दोन्ही निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमवेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
  • दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करणे बाकी आहे. मोदी यांनी जे सुरू केले आहे, त्याचा शेवट आम्ही करू, असे ट्विट चौधरी यांनी केले आहे. 
  • यापूर्वी पाकिस्तानने बालाकोट येथील जैशच्या तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर आपली हवाई हद्द भारतासाठी बंद केली होती. त्यानंतर १६ जून रोजी ही हद्द पुन्हा खुली करण्यात आली. 
  • भारताबरोबरचा व्यापारही पाकिस्तानने थांबवला असून, दोन्ही देशांदरम्यानची बस व रेल्वेसेवाही स्थगित केली आहे.
     

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »