कलामसॅट-V2

कलामसॅट-V2

इस्रोच्या कलामसॅट-V2 या उपग्रहाचं गुरुवारी रात्री 11.38 मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आलं.

# कलामसॅट-V2
इस्रोच्या कलामसॅट-V2 या उपग्रहाचं गुरुवारी रात्री 11.38 मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आलं. फक्त 1.26 किलो असलेला हा उपग्रह आतापर्यंतचा सर्वांत हलका उपग्रह असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. मुख्य म्हणजे हा उपग्रह विद्यार्थ्यांनी बनवला आहे.
विद्यार्थ्यांनी भविष्यात इंजिनिअर किंवा वैज्ञानिक व्हावं यासाठी हा उपग्रह प्रेरणास्त्रोत ठरेल असा विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (ISRO) व्यक्त केला आहे.
श्रीहरिकोटाच्या अवकाश केंद्रातून या उपग्रहाचं प्रक्षेपण झालं.
ISROचे प्रमुख के. शिवन म्हणाले की, "हा उपग्रह सर्वाधिक हलका आहे. आतापर्यंत अशा उपग्रहाची निर्मिती झाली नाही आणि अशा प्रकारचा उपग्रह कक्षेत देखील सोडला गेला नाही." कलामसॅट बरोबरच मायक्रोसॅट हा उपग्रह देखील प्रक्षेपित केला गेला.
या उपग्रहाचा उपयोग रेडिओ कम्युनिकेशनसाठी केला जाईल. याआधी एका भारतीय विद्यार्थ्याने 64 ग्रॅमचा सॅटेलाईट तयार केला होता. हा सॅटेलाइट अमेरिकेच्या NASAने प्रक्षेपित केला होता. पण हा सॅटेलाइट अवकाशाच्या कक्षेत सोडला गेला नव्हता तर उपकक्षेत सोडण्यात आला होता.
या प्रकारच्या उपग्रहाला सब-ऑरबिटल स्पेसफ्लाइट म्हणतात. या स्पेसफ्लाइटचं असं वैशिष्ट्य असतं की ते तांत्रिकदृष्ट्या अवकाशात तर पोहोचतात पण कक्षेत जात नाहीत. पण कलामसॅट हा कक्षेत जाईल, असं संशोधक सांगतात.
या उपग्रहाची निर्मिती चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या फर्मशी संबंधित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 9 उपग्रहांच प्रक्षेपण झालं आहे.
या मोहीमेचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की मोहिमेसाठी रॉकेटचं जो स्टेज वापरलं गेलं, त्याचा पुन्हा वापर करण्यात येणार आहे.
नेहमी असं होत असतं की एकदा का रॉकेट लाँच झालं की स्टेजचं रूप पूर्णतः बदलून जातं. त्याचे वेगवेगळे भाग होतात.
आतापर्यंत अवकाशात जे सॅटेलाइट सोडण्यात आले आहेत, त्यासाठी जे रॉकेट वापरले गेले त्यांचे अवशेष पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. कधीकधी हे पार्ट अवकाशात एकमेकांना भिडतात. त्यामुळे अवकाशवीरांनाही त्रास होतो, असं इस्रोचे प्रमुख के. शिवन सांगतात.
इंडियन पोलार सॅटेलाइट लाँच व्हेइकल (PSLV) या प्रक्षेपकाप्द्वारे हे दोन्ही उपग्रह कक्षेत सोडले जातील. PSLV ला एकूण 4 टप्पे आहेत. त्याचं वजन 260 टन आहे.
"आम्ही कार्यपद्धतीमध्ये थोडासा बदल केला आहे. महत्त्वपूर्ण संसाधनांचा योग्य वापर व्हावा या दृष्टीने ISROनं योजना आखली," असं के. शिवन यांनी सांगितलं.
चौथ्या टप्प्यात PSLV द्वारे एक प्रायोगिक प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. ज्याचा उपयोग अवकाश संशोधकांना होईल. यामुळे संशोधकांना शून्य गुरुत्वाकर्षणात प्रयोग करता येतील.
टाकाऊ पासून टिकाऊ?
या मोहिमेचं अनोखं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वापर झालेल्या रॉकेटचा पुनर्वापर केला जाईल. एका अर्थानं हे पुनरुज्जीवनच म्हणावं लागेल, असं शिवन स्पष्ट करतात.
अशा प्रकारचा प्रयोग फ्रान्सच्या संशोधन संस्थेनं केला आहे. या संस्थेचे प्रमुख ज्याँ येव्स लेगॉल म्हणतात की, या प्रकारचा प्रयोग फ्रान्सने देखील करून पाहिला आहे पण ही पद्धत खार्चिकच असते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »