देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर

देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर

मात्र राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत १७.५ टक्क्य़ांची कर्जमात्रा समाधानकारक असल्याचीही ‘क्रिसिल’ची टिप्पणी देशातील सर्व राज्यांचा विचार केल्यास महाराष

#देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर

मात्र राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत १७.५ टक्क्य़ांची कर्जमात्रा समाधानकारक असल्याचीही ‘क्रिसिल’ची टिप्पणी देशातील सर्व राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जाचा बोजा असला तरी राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण देशातील सर्वात कमी आहे. राज्य सकल उत्पन्न अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे चांगले असल्यानेच कर्जाचा बोजा वाढत असला तरी परिस्थिती चिंताजनक नाही.
राज्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे कौतुकच करण्यात आले आहे. महाराष्ट्रावर या आर्थिक वर्षांअखेर पाच लाख कोटींच्या आसपास कर्जाचा बोजा जाईल, असा अंदाज आहे. देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा सर्वाधिक आहे. पण राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत महाराष्ट्रावरील कर्जाचे प्रमाण सर्वात कमी आहे. राज्य सकल उत्पन्नाच्या तुलनेत (जीएसडीपी) कर्जाचे प्रमाण हे १७.५ टक्क्यांच्या आसपासच आहे. देशात एवढे कमी प्रमाण अन्य कोणत्याही राज्याचे नाही, असा निष्कर्षही ‘क्रिसिल’ने काढला आहे.
पंजाब, केरळ आणि राजस्थान या तीन राज्यांवरील कर्जाचा बोजा राज्य सकल उत्पन्नाच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कर्जाच्या बोजाचे हे एवढे प्रमाण आर्थिकदृष्टय़ा चिंताजनक मानले जाते. बिहार, मध्य प्रदेश, हरयाणा, झारखंड, तमिळनाडू, ओडिशा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे सकल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या तीन राज्यांची आर्थिक परिस्थिती समाधानकारक आहे.
महाराष्ट्राचे राज्य सकल उत्पन्न चांगले असल्यानेच कर्जाचे प्रमाण जास्त असले तरी आर्थिक चित्र चांगले आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत राज्यावरील कर्जाचे प्रमाण राज्य सकल उत्पन्नाच्या १९.४ टक्के होते. २०१८च्या आर्थिक वर्षांअखेरस हेच प्रमाण १७.४ टक्क्यांपर्यंत घटले होते. राज्याचे महसुली उत्पन्न वाढल्यानेच आर्थिक आघाडीवर चित्र  समाधानकारक असल्याचेही मत नोंदविण्यात आले आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »