# चीनची ऐतिहासिक कामगिरी; चंद्रावर उगवले कापसाचे बियाणे:-
चीनने अंतराळात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. चीनला चंद्रावर कापसाचे बियाणे उगविण्यात यश मिळाले आहे. चंद्रावर उगविण्यात आलेला हा जगातील पहिला जैविक घटक आहे. चीनच्या महत्वकांक्षी ‘चांग ई-४ ’ मिशनसोबत कापसाबरोबर इतर बियाणे देखील पाठविण्यात आले होते. मात्र, यापैकी कापसाचे बियाणला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेसाठी हे ऐतिहासिक यश मानले जात आहे.
नवीन वर्षात ३ जानेवारी रोजी चीनने ‘चांग ई -४’ हे यान पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या बाजूवर उतरविण्याचा कारनामा करून दाखविला होता. या महत्वकांक्षी मोहिमेसोबत चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही उपकरण पाठवून देण्यात आले होते. यानंतर लागलीच याठिकाणी पहिला जैवप्रयोग करण्यात आला.
चांग ई -४’ या मोहिमेसोबत वैज्ञानिकांनी बकेट सारखा एक विशेष धातूचा डब्बा पाठवून दिला होता. यामध्ये माती, पाणी व हवेची व्यवस्था करण्यात आलेली होती. तर कापूस, रेपसीड, बटाटा, अरबीडॉप्सिसच्या बियाणांबरोबर मधमाशांचे अंडे व किन्व पाठवून देण्यात आले होते. या घटकासोबत चंद्रावर करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये यश आले. इतर बियाणे वगळता फक्त कापूसाचे बियाणे उगविण्यास सुरूवात झाले आहे
या घडामोडीवर खालील प्रमाणे प्रश्न::
प्रश्न:- याबद्दल तुमचे मत मान्डा. मतामध्ये मानवाच्या विकासाचा आणि निसर्गाचा दोन्हीचा विचार अपेक्शीत आहे. पुढे जाउन space war अश्या प्रकारच्या संकल्पना ही अस्तित्वात येण्याची शक्यता आहे का? याबद्दल काय वाटते