माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे निधन

माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे निधन
माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे निधन

१९५२ ते १९५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व

 • माजी कसोटीपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचे मुंबईत आज सकाळी (सोमवार) वृद्धापकालाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. 
 • आपटे यांनी सन १९५२ ते १९५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 
 • त्यांनी 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. 
 • ते मुंबईचे नगरपालही होते.
 • आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ साली केली. ते फलंदाज म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांची सुरुवात मात्र फिरकी गोलंदाज म्हणूनच झाली होती. 
 • एल्फिन्स्टन कॉलेजमघ्ये शिकत असताना त्यांनी विनू मंकड यांच्याकडून गोलंदाजीचे धडे घेतले. त्यांनी सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या शेवटच्या इनिंमध्ये १०० ची सरासरी घेण्यापासून रोखले होते. 
 • ते १९ वर्षांचे असताना त्यांनी मेरीलबोन क्रिकेट क्लब विरुद्ध भारतीय विद्यापीठांचे प्रतिनिधीत्व केले होते. हेच त्यांचे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील पदार्पण होते. 
 • १९५३ मध्ये आपटे यांची वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. त्यावेळी ते पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू ठरले. 
 • १९५४ मध्ये त्यांनी केवळ एकच प्रथम दर्जा क्रिकेटचा सामना खेळले. त्यानंतर त्यांची भारतीय संघासाठी कधीही निवड झाली नाही. पुढे त्यांची निवड का होऊ शकली नाही हे कायमच 'न सोडवता आलेले कोडे'च राहिले.

आत्मचरित्रात केला गौप्यस्फोट:-

 • माधव आपटे यांनी ‘अ‍ॅझ लक वुड हॅव इट’ हे आत्मचरित्र लिहिले. 
 • त्यावेळच्या निवड समितीचे लाला अमरनाथ यांनी आपटे यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या दिल्लीतील कोहिनूर मिलच्या व्यावसायात भागिदारी देण्याची मागणी केली. 
 • मात्र वडिलांनी लाला अमरनाथ यांना आपले भागिदार बनवण्यास नकार दिल्याने आपली निवड होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट आपटे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. आपटे यांनी ३४ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली.
 • आपटे डी. बी. देवधर ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट खेळले आहेत. ते बीसीसीआयचे संस्थापक सदस्यही होते. शिवाय त्यांनी क्लब्स लेजंड क्लबचेही प्रमुखपद सांभाळले होते.
 • आपटे हे मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्षही होते. सध्या ते आपटे ग्रुपच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत होते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »