#UNSC imposes sanctions on South Sudan

#UNSC imposes sanctions on South Sudan

#UNSC ने दक्षिण सुदानवर प्रतिबंध लादले

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेनी (UNSC) शस्त्रबंदीची कालमर्यादा विस्तारीत करण्यासाठी प्रस्तावित ठरावाला मंजुरी दिली आहे आणि दक्षिण सुदानवर प्रतिबंध लादले. नवीन ठरावाच्या बाजूने 10 मते दिली. रशिया आणि चीनने या कारवाईचा निषेध केला.
ठराव स्वीकारल्यानंतर दक्षिण सुदानमध्ये शास्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच युद्धाचा भाग बनणार्‍या आठ सुदानी नागरिकांवर मालमत्तेसंबंधी प्रतिबंध लादण्यात आले, त्यांची संपत्ती गोठविण्यात आली आहे आणि जागतिक प्रवास बंदी घातली.
जवळजवळ 4 लक्ष लोक ठार झालेल्या पाच वर्षापासून चाललेल्या गृहयुद्धाला संपुष्टात आणण्यासाठी सप्टेंबर महिन्यात शांततेचा करार करण्यात आला. परंतु कराराच्या अंमलबजावणीसाठी अद्याप महत्वाचे घटक अस्तित्वात नाहीत.
  
UNSC:-
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार आहे. 
1945 साली स्थापना झालेल्या या संघटनेचे आज 15 सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे कायमस्वरूपी (स्थायी) सदस्य आहेत. या कायमस्वरूपी सदस्यांकडे ‘व्हीटो’ (नकाराचा) अधिकार आहे. उर्वरित 10 तात्पुरता (अस्थायी) सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी केली जाते. परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ एक महिन्याचा असतो.
सन 2019 मध्ये सदस्य असलेले देश:- आयव्हरी कोस्ट, इक्वेटोरियल गिनी, कुवैत, पोलंड, पेरू, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, डोमिनिक प्रजासत्ताक, बेल्जियम, जर्मनी.

प्रश्न:- यूएनएससीची भूमिका आणि महत्त्व विचारात घ्या, यूएनएससीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे का? भारताला स्थायी सदस्यता का द्यावी? टिप्पणी करा.

हा प्रश्न का? – Recently Vice President calls for renewed efforts for India to gain permanent membership of the UN Security Council; 
The Vice President of India, Shri M. Venkaiah Naidu has called for renewed efforts by India to gain permanent membership of the UN Security Council.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »