UNCTAD याचा ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2019

UNCTAD याचा ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2019

जागतिक गुंतवणूक अहवाल 2019

संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) कडून त्याचा ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2019’ याच्यानुसार, 2018 साली भारतात 42 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) झाली.
दक्षिण आशियाई क्षेत्रात झालेल्या FDIपैकी जवळपास 77% गुंतवणूक भारतात झाली. भारतातली FDI गुंतवणूक 6 टक्क्यांनी वाढून 42 अब्ज डॉलर एवढी झाली.
सन 2018 मध्ये जागतिक FDIमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेनी 13% घट झाली, जी 1.3 लक्ष कोटी (महादम) डॉलर एवढी होती.
FDIसाठी एक स्त्रोत म्हणून असलेल्या देशांच्या यादीत भारताचे स्थान एका क्रमांकाने घसरून 10 व्या स्थानी आले आहे.
दक्षिण आशियाई क्षेत्रातल्या इतर देशांमध्ये बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली, जी अनुक्रमे 3.6 अब्ज डॉलर आणि 1.6 अब्ज डॉलर एवढी होती. तर पाकिस्तानामध्ये 27 टक्क्यांची घट होत 2.4 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक झाली आहे.
UNCTAD:-
संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याची स्थापना 1964 साली करण्यात आली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. संघटनेला 16 एप्रिल 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने स्वीकारले आणि 22 डिसेंबर 2015 रोजी त्याला सुधारित केले गेले. 
ही संघटना व्यापार, गुंतवणूक आणि विकास मुद्दे संबंधित क्षेत्रात एक प्रमुख म्हणून कार्य करते. सध्या, UNCTAD चे 194 सदस्य राज्ये आणि देश आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »