गुलाबी शहर आता जागतिक वारसा स्थळ

गुलाबी शहर आता जागतिक वारसा स्थळ

जयपूर  हे वीरता आणि संस्कृतीचे प्रतीक

गुलाबी शहर आता जागतिक वारसा स्थळ:- गडकोटांचे शहर, गुलाबी शहर अशी विविध वैशिष्ट्ये मिरवित पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या जयपूरला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) शनिवारी याबाबतचे अधिकृत ट्विट करून जयपूरवासीयांचे विशेष कौतुक केले. 
या सन्मानाने जयपूरच्या स्थापत्यकलेच्या शतकांपासूनच वैभवी परंपरेचा आणि झळाळत्या संस्कृतीचा पुन्हा एकवार जगभर गजर झाला आहे. 
अझरबैझानमधील बेकूमध्ये 'युनेस्को'ची ४३वी परिषद ३० जूनपासून सुरू आहे. त्यातच जयपूरच्या (राजस्थान) प्रस्तावावर चर्चा करून त्यावर मोहोर लावण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. 
'जयपूर  हे वीरता आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. मनमोहक आणि हर्षोल्हासाची भूमी आहे. जयपूरकरांचे आदरातिथ्य जगभरातील नागरिकांना तिथे आकर्षित करीत असते. हे शहर वारसास्थळ बनल्याने आनंद झाला आहे,' अशा शब्दांत मोदी यांनी ट्विट केले आहे. 
स्मारके आणि स्थळांबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेने 'आयसीओएमओएस' जयपुरात २०१८मध्ये भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला. तो तपासल्यानंतर बेकूमध्ये मंजुरी देण्यात आली. 
'शहर नियोजन आणि स्थापत्याचा सुरेख संगम आणि कल्पनांच्या आदानप्रदानातून मध्ययुगाच्या अखेरीचे चे अनुकरणीय उदाहरण म्हणून जयपूरबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मध्ययुगीन काळात दक्षिण आशियात, संपन्न व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्र म्हणून जयपूर अपवादात्मक उदाहरण आहे. जोडीला या शहरात जिवंत असलेल्या हस्तकलेच्या विविध प्रकारांना आजही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता आहे', अशा शब्दांत 'युनेस्को'च्या येथील अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावात जयपूरचा गौरव केला होता. 
स्थापत्याचा समृद्ध वारसा:-
सवाई जयसिंह दुसरे यांनी १७२७मध्ये या शहराची स्थापना केली. सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या राजस्थानची राजधानी म्हणून तेव्हापासून शहर प्रसिद्ध आहे. शहर नियोजनात प्राचीन हिंदू, मुघल आणि समकालीन पाश्चिमात्य संकल्पनांचा सुरेख मेळ घालून हे शहर वसवण्यात आले आहे. 
अशी आहे युनेस्कोच्या वारसा समितीची रचना 
-२१ सदस्य देशांचे प्रतिनिधी वार्षिक परिषदेत घेतात निर्णय 
-परिषद बोलावण्याचा अधिकारही संबंधितांनाच 
आतापर्यंत १६७ देशांतील १०९२ स्थळांना वारसा दर्जा 
जयपूरला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणे ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. या सन्मानामुळे राजस्थानच्या या राजधानीला अधिक झळाळी मिळाली आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यवसायाला बळ मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यातून पायाभूत सुविधा बळकट करण्यासही मदत होईल.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »