सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार

देशात आपत्ती व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार

देशात आपत्ती व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ सुरू केले आहेत.

आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे, हा या पुरस्कारांचा उद्देश आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार दरवर्षी 3 पात्र संस्था आणि व्यक्तींना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ देण्यात येईल.

पुरस्कार स्वरूप:-

प्रमाणपत्र आणि 5 लाख ते 51 लाख रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या पुरस्कारांसाठी फक्त भारतीय नागरिक आणि भारतीय संस्था पात्र असतील.एखाद्या पुरस्कार विजेत्या व्यक्तीसाठी पुरस्काराशी रक्कम 5 लाख रुपये असेल, तर संस्थेसाठी पुरस्काराशी रक्कम 51 लाख रुपये असेल.

संस्थांसाठी ही पुरस्काराची रक्कम केवळ आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामांसाठी वापरली जाऊ शकते.2019साठीच्या प्रथम सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांची घोषणा 23 जानेवारी 2019 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी केली जाईल.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »