रियो डी जनेरो: 2020 सालासाठी UNESCOची ‘वास्तुकलेची जागतिक राजधानी

रियो डी जनेरो: 2020 सालासाठी UNESCOची ‘वास्तुकलेची जागतिक राजधानी

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक

# रियो डी जनेरो: 2020 सालासाठी UNESCOची ‘वास्तुकलेची जागतिक राजधानी'

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) याने 2020 सालासाठी आपली 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' (World Capital of Architecture) म्हणून ब्राझील देशाच्या ‘रियो डी जनेरो’ या शहराची निवड केली आहे.
UNESCO आणि आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट संघटना (UIA) या संघटनांनी नोव्हेंबर 2018 मध्ये 'वास्तुकलेची जागतिक राजधानी' या शीर्षकाखाली नव्या उपक्रमाला संयुक्तपणे सुरूवात केली. याउपक्रमाच्या अंतर्गत रियो डी जनेरो या शहराची प्रथमच निवड करण्यात आली आहे.
ब्राझिलीया हे राजधानी शहर उभारणार्‍या ऑस्कर निमेयर या प्रख्यात वास्तुकलाकाराची उभी मूर्ती ब्राझील देशात आहे.
UNESCO:-
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) याने 2020 सालासाठी आपली 'वास्तुकलेची जागतिक राजधानी'

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »