तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांना घोषित

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांना घोषित

राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या 1028 च्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कारासाठी....

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांना घोषित:

राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या 1028 च्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कारासाठी, बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.

विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील दत्तोबा फुलसुंदर, लता पुणेकर, जयमाला इनामदार, प्रकाश खांडगे, विद्याधर जिंतीकर व श्यामल गरुड यांनी सन 2018 या वर्षीच्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.

पुरस्काराचे स्वरूप:-

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप रु.5 लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

या पूर्वी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार खालील व्यक्तिंना देण्यात आला

1. कांताबाई सातारकर

2. वसंत अवसरीकर

3. सुलोचना नलावडे

4. हरिभाऊ बढे

5. मंगला बनसोडे

6. साधू रामा पाटसुते

7. अंकुश खाडे उर्फ बाळू

8. प्रभा शिवणेकर

9. भीमाभाऊ सांगवीकर

10. गंगारामबुवा कवठेकर

बशीर कमरोद्दिन मोमीन यांच्या विषयी:-

लोकशाहीर बशीर कमरोद्दिन मोमीन ( कवठेकर ) यांचा जन्म मु. कवठे (येमाई) तालुका शिरुर जि. पुणे येथे 1 मार्च 1947 रोजी झाला. त्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे.

त्यांना शालेय जीवनातच शाहिरी आणि काव्य लेखनाचा छंद असल्याने पुढे त्यांनी लावण्या, कलगीतुरा,वगनाट्य, पोवाडे, नाट्यछटा व इतर विषयावरही लेखन केले आहे.

त्यांना शालेय जीवनातच शाहिरी आणि काव्य लेखनाचा छंद असल्याने पुढे त्यांनी लावण्या, कलगीतुरा,वगनाट्य, पोवाडे, नाट्यछटा व इतर विषयावरही लेखन केले आहे.

वेडात मराठे दौडले सात, लंका कुणी जाळली या ऐतिहासिक नाटकांचे त्यांनी लेखन केले आहे.

त्यांना साहित्य लेखनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी गीत लेखन केले आहे.

त्यांची सोयऱ्याला धडा शिकवा, दारू सुटली चालना भेटली, मनाला आळा एड्स टाळा, दारूचा झटका संसाराला फटका, हुंड्यापाई घटलं सारं ही लोकनाट्य आकाशवाणीवर प्रसारित झाली आहेत.

दारूबंदी, गुटखा ,हुंडाबंदी इत्यादी शासनाच्या योजनांच्या प्रचारात काम केले असल्यामुळे त्यांना व्यसनमुकती पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मोमीन कवठेकर यांच्या साहित्यावर पुणे विद्यापीठात पीएच.डी. करण्यात आली असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून त्यांना गौरविण्यात आले आहे.

सारासार विचार करुन आणि या मुद्द्यांपलीकडेही काही मुद्दे असल्यास सविस्तर मत मांडावे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »