२०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव 

२०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव 

मराठी भाषा आणि साहित्यातील बहुमूल्य योगदानासाठी राज्य सरकारच्या भाषा विभागाकडून दिला जाणारा २०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार मह

२०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव 

मराठी भाषा आणि साहित्यातील बहुमूल्य योगदानासाठी राज्य सरकारच्या भाषा विभागाकडून दिला जाणारा २०१८ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जाहीर झाला आहे.

एलकुंचवार यांना आतापर्यंत सरस्वती सन्मान ,साहित्य अकादमी पुरस्कार ,जनस्थान पुरस्कार आदी पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहेत.

श्री पु.भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार 'साहित्य प्रसार केंद्र' या प्रकाशन संस्थेला जाहीर झाला आहे.

गेली ४८ वर्ष मराठी प्रकाशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या साहित्य प्रसार केंद्राने आजपर्यंत सुमारे ३०० पुस्तके प्रकाशित केली आहेत .सुरेश भट ,मारुती चितपल्ली ,राम शेवाळकर इत्यादी साहित्यिकांसह, बाल ,आध्यात्मिक पुस्तके ,कोष प्रवास वर्णने संस्थेने प्रकाशित केली आहेत .

डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ.कल्याण काळे याना जाहीर झाला आहे.

मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार 'झाडीबोली' चे अभ्यासक डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांना जाहीर झाला आहे.

श्री .पु.व विंदा पुरकाराकरिता निवड समितीवर श्रीपाद भालचंद्र जोशी ,बाबा भांड यांनी काम पहिले .तर पाडगावकर व केळकर पुरस्कार समितीवर डॉ.सदानंद मोरे ,दिलीप करंबेकर व बाबा भांड यांनी काम पहिले.

२७ फेब्रुवारीला म्हणजे मराठी भाषा गौरव दिनी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »