अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान

 • महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान समजला जातो. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.
 • केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येक भारतीयाला आणि सिनेरसिकाला अभिमान वाटावा अशीच ही बातमी आहे.
 • अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विटही करण्यास सुरुवात केली आहे.

अमिताभ बच्चन:-

 • अमिताभ बच्चन (मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन, जन्म: ११ ऑक्टोबर १९४२) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.
 • अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्थानी’ या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पदार्पण अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ही मिळाला होता.
 • त्यानंतर त्यांच्या रुपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे.
 • सात हिंदुस्थानी, आनंद, रेश्मा और शेरा, गुड्डी हे अमिताभ बच्चन यांचे सुरुवातीच्या काळातले सिनेमा होते. 1973 मध्ये आलेल्या जंजीर या सिनेमामुळे त्यांची इमेजच बदलून गेली. हिंदी सिनेसृष्टीला अँग्री यंग मॅन मिळाला. हा अँग्री यंग मॅन म्हणून जवळपास दोन दशकांहून अधिक काळ अमिताभ बच्चन वावरले.
 • विजय खन्ना हे त्यांनी साकारलेलं पात्र हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोनच म्हणता येईल. त्यानंतर मग दीवार, शोले, जमीर, कभी कभी, हेरा-फेरी, रोटी कपडा और मकान, अग्नीपथ, डॉन, शक्ती, शहनशाह या आणि अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी मनोरंजन केलं.
 • इन्सानियत सिनेमानंतर त्यांनी ब्रेक घेतला होता. त्यानंतर मृत्यूदाता या सिनेमाद्वारे कमबॅकही केलं. पण तो सिनेमा फ्लॉप झाला. मात्र 2000 पासून त्यांची चरित्र भूमिका करण्यास सुरुवात केली. विविधांगी भूमिका अमिताभ बच्चन यांनी केल्या. ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
 • बागबान, कभी खुशी कभी गम, खाकी, लक्ष्य, बंटी और बबली, पा, विरुद्ध, फॅमिली, सरकार राज, बुढ्ढा होगा तेरा बाप, 102 नॉट आऊट हे आणि असे सिनेमा केले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
 • १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.
 • छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या शोला ही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोचेही सगळे सिझन गाजले. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना आता दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

अमिताभ बच्चन यांना मिळालेले इतर पुरस्कार:-

 • आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले.
 • चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
 • अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे.

दादासाहेब फाळके यांच्याबाद्द्ल:-
जन्म    ३० एप्रिल १८७०
मृत्यू    १६ फेब्रु्वारी १९४४
कार्यकाळ    १९१३ - १९३७
वडील:- धुंडीराज गोविंद फाळके
दादासाहेब फाळके पुरस्कार:-

 • दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.
 • १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.
 • दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो.
 • दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.
 • १९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.

खाली दादासाहेब फाळके पुरस्कार १९६९ पासून ते आत्तापर्यंतचे दिले आहेत. आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत ते हायलाईट केले आहेत.

2017      विनोद खन्ना                  हिन्दी
2016       कसिनाथुनी विश्वनाथ     तेलुगू

2015      मनोज कुमार                हिन्दी
2014      शशि कपूर                  हिन्दी
2013      गुलजार                      हिन्दी
2012      प्राण                         हिन्दी
2011      सौमित्र चटर्जी              बंगाली
2010      के. बालचन्दर             तमिल,तेलुगू
2009      डी. रामानायडू           तेलुगू
2008         वी. के. मूर्ति            हिन्दी
2007         मन्ना डे                  बंगाली,हिन्दी
2006      तपन सिन्हा                बंगाली,हिन्दी
2005      श्याम बेनेगल             हिन्दी
2004      अडूर गोपालकृष्णन     मलयालम
2003      मृणाल सेन               बंगाली    
2002      देव आनन्द               हिन्दी
2001      यश चोपड़ा               हिन्दी
2000      आशा भोसले            हिन्दी,मराठी
1999      ऋषिकेश मुखर्जी       हिन्दी
1998      बी. आर. चोपड़ा        हिन्दी
1997         कवि प्रदीप            हिन्दी
1996      शिवाजी गणेशन        तमिल
1995      राजकुमार               कन्नड़
1994      दिलीप कुमार           हिन्दी
1993         मजरूह सुल्तानपुरी     हिन्दी
1992      भूपेन हजारिका         असमिया
1991      भालजी पेंढारकर         मराठी
1990      अक्कीनेनी नागेश्वरराव     तेलुगू
1989      लता मंगेशकर           हिन्दी,  मराठी
1988      अशोक कुमार           हिन्दी
1987      राज कपूर                हिन्दी
1986         बी. नागी. रेड्डी         तेलुगू
1985      वी. शांताराम            हिन्दी,मराठी
1984      सत्यजीत रे              बंगाली
1983      दुर्गा खोटे                हिन्दी,मराठी
1982      एल. वी. प्रसाद         हिन्दी,तमिल,तेलुगू
1981      नौशाद                   हिन्दी
1980      पैडी जयराज           हिन्दी,तेलुगू
1979      सोहराब मोदी           हिन्दी
1978      रायचन्द बोराल         बंगाली,हिन्दी
1977      नितिन बोस             बंगाली,हिन्दी
1976      कानन देवी             बंगाली
1975      धीरेन्द्रनाथ गांगुली     बंगाली
1974      बोम्मीरेड्डी नरसिम्हा    तेलुगू
        रेड्डी
1973      रूबी मयेर्स (सुलोचना) हिन्दी
1972      पंकज मलिक            बंगाली, हिन्दी
1971      पृथ्वीराज कपूर          हिन्दी (मृत्यूपश्चात)
1970      बीरेन्द्रनाथ सिरकर    बंगाली
1969      देविका रानी            हिन्दी

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »