23 Aaugust Current Affairs

23 Aaugust Current Affairs
23 Aaugust Current Affairs

पाकिस्तानला धक्का टेरर फंडिंगमुळे ब्लॅकलिस्टेड

 • कर्जाच्या संकटात होरपळणाऱ्या पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) या संस्थेच्या एशिया पॅसिफिक गटाने पाकिस्तानला 'ब्लॅकलिस्ट' केलं आहे. यापूर्वी FATF ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं होतं.
 • भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की एएफटीएफच्या एशिया पॅसिफिक गटाने जागतिक मापदंड पूर्ण करु न शकल्याने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याशी संबंधित ४० मापदंडांपैकी ३२ मापदंड (निकष) पाकिस्तानने पूर्ण केले नाहीत. परिणामी एफएटीएफने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केलं. 
 • काळ्या यादीत नाव आल्यानंतर आता पाकिस्तानला जगाकडून कर्ज घेण्यास आणखी अडचणी येणार आहेत. एफएटीएफने शुक्रवारी सांगितलं, 'पाकिस्तान टेरर फंडिंगसंदर्भात आपला कृती आराखडा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. यासाठी पाकिस्तानला जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण पाकने मे २०१९ पर्यंत देखील आपलं काम पूर्ण केलं नाही.' 
 • गेल्या वर्षी पाकला FATF ने ग्रे यादीत टाकलं होतं आणि कृती आराखड्यानुसार काम करण्याचं आश्वासन पाकिस्तानने FATF ला दिलं होतं. त्यात अपयशी करल्याने आता पाकला येत्या ऑक्टोबर २०१९ पर्यंत काळ्या यादीतून बाहेर येण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. 
   

६ दहशतवादी तामिळनाडूत अॅलर्ट

 • लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे ६ दहशतवाद्यांनी श्रीलंकामार्गे तामिळनाडूतील कोइम्बतूरमध्ये प्रवेश केल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या माहितीनंतर तामिळनाडू राज्यात हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. 
 • तामिळनाडूत प्रवेश केलेल्या ६ दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी, एक श्रीलंकेतील आणि एक तामीळ दहशतवादी आहे. हे सर्व दहशतवादी मुस्लिम असले तरी त्यांनी हिंदू दिसण्यासाठी तशी वेशभूषा केली आहे. त्यांनी आपल्या कपाळावर टिळा आणि विभूतीही लावली आहे. 
 • ही माहिती मिळाल्यानंतर चैन्नई शहरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्यूआरटी टीमही तैनात करण्यात आली आहे. प्रमुख ठिकाणांवर लोकांची तपासणीही करण्यात येत आहे. या दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करण्यासाठी श्रीलंकेतील काही लोकांनी मदत केल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांच्या हाती आली आहे.
   
23 Aaugust Current Affairs
23 Aaugust Current Affairs

पाकची कूटनीती

 • गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून काश्मीरमध्ये आणण्याची योजना आखत आहे, असे समजते. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसवण्याची योजना आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान भारतात घातपात घडवण्याच्या योजना आखत आहे.
 • 'रॉ' या गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार जैश-ए-महंमदने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याचा कट रचला आहे. पाकिस्तानात बहावलपूरमध्ये मारकाज उस्मान-ओ-अली येथे १९ ऑगस्टला बैठक झाल्याची माहिती आहे. जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ रौफ अझगरने या बैठकीचे नेतृत्व केले, अशी सूत्रांची माहिती आहे.

एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला

 • थकित रक्कम चुकती न केल्याच्या कारणावरून इंडियन ऑइलसह सर्व तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबवला आहे. आतापर्यंत या तेलकंपन्यांनी एकूण सहा विमानतळांवीपरील एअर इंडियाचा इंधनपुरवठा थांबवण्यात आला आहे. असे असले, तरी एअर इंडियाच्या विमानांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरूच आहे.
 • ज्या विमानतळांवरील इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे, त्यांमध्ये रांची, मोहाली, पाटणा, विशाखापट्टणम, पुणे आणि कोच्ची या विमानतळांचा समावेश आहे. आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया थकित कर्जाची परतफेड करू शकणार नाही, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. गुरुवारी संध्याकाळपासूनच हा इंधनपुरवठा बंद करण्यात आला आहे.
   
23 Aaugust Current Affairs
23 Aaugust Current Affairs

एचएसबीसीमध्ये कर्मचारी कपात

 • एचएसबीसी बँकेने भारतातील दीडशे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. हे कर्मचारी या बँकेच्या बॅक ऑफिसशी संबंधित ते प्रामुख्याने पुणे व हैदराबाद कार्यालयात कार्यरत होते.
 • जागतिक धोरणाचा भाग म्हणून कर्मचारीसंख्येचा आढावा घेतला जात आहे, असे या बँकेने म्हटले आहे.
 • या बँकेचे जगभरात एकूण २.३८ लाख कर्मचारी असून भारतातील बँक ऑफिसमध्ये १५ हजार कर्मचारी आहेत. यापूर्वी डॉइश बँकेनेही काही कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.

टीम इंडियाच्या बॅटिंग कोचला फक्त १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव

 • भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, विराट कोहली, रोहित शर्मा अशा दिग्गजांना मार्गदर्शन करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या राठोड यांनी केवळ १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. असं असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
 • एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं नुकतीच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची घोषणा केली. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारत अरुण तर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांना कायम ठेवण्यात आलं आहे. 
 • आधीचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या जागी राठोड यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, राठोड यांच्या क्रिकेटमधील अनुभववारून चर्चेला पेव फुटलं आहे.  राठोड यांनी केवळ सहा कसोटी व सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. 
 • त्यांच्या नावावर अवघ्या ३२४ धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी अजिबात प्रभावी नव्हती. कसोटीतील दहा डावांत १३.१०च्या सरासरीनं त्यांनी १३१ धावा केल्या आहेत. एकही अर्धशतक त्यांच्या नावावर नाही. 
 • एकदिवसीय सामन्यात राठोड यांनी केवळ १९३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २७.५७ आहे. एकदिवसीय सामन्यात त्यांच्या नावावर दोन अर्धशतके असली तरी एकदाही त्यांना शतकी खेळी करता आलेली नाही. 
 •  स्थानिक क्रिकेटमधील त्यांची कारकिर्द दीर्घ आहे. पंजाब व हिमाचल प्रदेशकडून प्रथम श्रेणी व अन्य स्पर्धांतून खेळताना त्यांनी ११४७३ धावा केल्या आहेत.
   
23 Aaugust Current Affairs
23 Aaugust Current Affairs

माणसासारखा दिसणारा रोबोट रशियाने अंतराळात पाठवला

 • रशियाने गुरुवारी अंतराळात पाठवलेल्या मानवरहित यानाने चक्क माणसासारखा दिसणारा रोबोट आपल्यासोबत नेला. 'फेडोर' असे या रोबोटचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अंतराळवीरांच्या मदतीने दहा दिवसांचे प्रशिक्षण या रोबोटला देण्यात येणार आहे.
 • 'फेडोर' हा रशियाने अंतराळात पाठवलेला पहिला रोबोट आहे. सोयुज- एमएस-14 यानातून स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी कझाकिस्तानच्या बैकनूर प्रक्षेपण केंद्रातून रोबोट अंतराळात पाठवण्यात आला. सोयूज शनिवारी अंतराळात पोचेल आणि 7 सप्टेंबरपर्यंत तिथे राहील. सोयूज यानातील वैमानिकांच्या सीटवर 'फेडोर' या रोबोटला बसवण्यात आले आहे. त्याच्या हातात रशियाचा छोटा झेंडा देण्यात आला आहे.
   

वाघांच्या शिकारीचे सर्वाधिक प्रमाण भारतात

 • जगभरातील एकूण वाघांपैकी ५६ टक्के वाघ भारतात असले तरी  वाघांच्या शिकारीचे सर्वाधिक प्रमाणदेखील भारतातच आहे. व्याघ्र अवयवांच्या जप्तीच्या एकूण घटनांपैकी सुमारे ४०.५ टक्के घटना या भारतातील आहेत. वन्यप्राणी आणि वनस्पतींवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘ट्रॅफिक’ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
 • २००० ते २०१८ या १८ वर्षांच्या काळात जगभरातील ३२ देशांतून दोन हजार ३५९ वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. यात प्रामुख्याने हाडे, कातडी याचा समावेश आहे. यापैकी एक हजार ८६ घटना या १३ आशियाई देशातील आहेत. या तेरा देशात दरवर्षी सरासरी ६० जप्तीच्या घटना नोंदवण्यात आल्या. वाघाव्यतिरिक्त अस्वल आणि हत्तीचे अवयव देखील मोठय़ा प्रमाणावर जप्त करण्यात आले. दरवर्षी सुमारे ५८ वाघांची शिकार त्याच्या कातडीसाठी केली जाते. २०१६ पासून हे प्रमाण अधिक वाढले आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत सरासरी वार्षिक ४४ टक्क्य़ांपासून ते ७३ टक्क्य़ांपर्यंत हे प्रमाण वाढले आहे.
 • वाघांच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणात एकूण किती आरोपींना पकडण्यात आले आणि त्यापैकी किती आरोपींना शिक्षा झाली याची पूर्ण आकडेवारी नाही. मात्र, अहवालानुसार ५९१ प्रकरणांत सुमारे एक हजार १६७ आरोपींना अटक करण्यात आली. यातील ३८ टक्क्य़ांपेक्षाही अधिक आरोपी भारतातील आहेत. भारतानंतर इंडोनेशिया आणि चीनचा नंबर आहे. अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींपैकी २५९ आरोपींवर तिन्ही देशात खटला चालवण्यात आला. यातील १७.४ टक्के आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. भारतात वाघांची संख्या अधिक असल्यामुळे शिकारीचे प्रमाणही अधिक आहे.
 • मात्र, वन्यजीवविषयक कडक कायदेही भारतात आहेत. गेल्या एक-दीड दशकात व्याघ्र संरक्षणाचे प्रयत्नही वाढले आहेत. २००८ साली भारतात वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्यात आल्यानंतर वाघ्र अवयवांच्या तस्करीची प्रकरणे उघडकीस आली असून अनेक मोठय़ा तस्करांना अटक करण्यात आली आहे.

दरवर्षी १२४ वाघांचे अवयव जप्त:-

दरवर्षी १२४ वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. यात भारत अग्रस्थानी असून दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे.
भारत – ४०.५ टक्के (४६३)
चीन – ११ टक्के (१२६)
इंडोनेशिया – १०.५ टक्के (११९)
 

23 Aaugust Current Affairs

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »