50 वा इफ्फी महोत्सव चित्रपट यादी जाहीर

50 वा इफ्फी महोत्सव चित्रपट यादी जाहीर
50 वा इफ्फी महोत्सव चित्रपट यादी जाहीर

दोन ठिकाणी 14 चित्रपट दाखवले जाणार

  • ‘पडोसन’ आणि ‘चलती का नाम गाडी’ हे चित्रपट ‘जुने क्लासिक’ विभागांतर्गत दाखविले जाणार
  • 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये खुल्या चित्रपटगृहात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. यावर्षी 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान इफ्फीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जाईल. दरवर्षी इफ्फी सिनेरसिकांसाठी खुल्या चित्रपटगृहात सिनेमांचे खेळ आयोजित करत असते.
  • यावर्षीच्या अशा खेळांची संकल्पना ‘सिनेमाचा आनंद’ अशी असेल. विनोदी शैली संबंधित सदाबहार चित्रपट प्रकारामध्ये तसेच इंडियन पॅनोरमा विभागात दाखवले जातील. यावर्षी चित्रपटांचे आयोजन जॉगर्स पार्क ( अल्टीन्हो, पणजी) आणि मिरामार बीच, पणजी या दोन ठिकाणी 21 ते 27 नोव्हेंबर दरम्यान केले जाईल. जॉगर्स पार्कमध्ये विनोदी चित्रपट तर मीरामार बीचवर इंडियन पॅनोरमा विभागातील निवडक चित्रपट दाखवले जातील. हे चित्रपट सर्वांसाठी नोंदणीशिवाय खुले असतील.

जॉगर्स पार्क (अल्टीन्हो, पणजी)  येथील चित्रपट:-
1) चलती का नाम गाडी (1958)
२) पडोसन(1968)
३) अंदाज अपना अपना (1994)
४) हेराफेरी (2000)
५) चेन्नई एक्स्प्रेस (2013)
६) बधाई हो (2018)
७) टोटल धमाल (2019)


मिरामार बीच येथे दाखविण्यात येणारे चित्रपट:-
१) नकोम-इआ कुम्पासार {Nachom-ia Kumpasar (Konkani)}
२) सुपर 30 (हिंदी)
 ३) आनंदी गोपाळ (मराठी)
४) उरी-द-सर्जिकल स्ट्राईक (हिंदी)
५) हेल्लारो (गुजराती)
६) गल्ली बॉय (हिंदी)
७) F2-फन ॲण्ड फ्रस्ट्रेशन (तेलगु)

 

 

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »