राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत ९ पुरस्कार भोंगाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्लीत ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

मराठी चित्रपटास मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार:-

मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत ९ पुरस्कार

 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा
 • पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
 • सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)
 • सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

 ‘भोंगा’ : सर्वोत्तम मराठी  चित्रपट

प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. मराठी भाषेसाठी  ‘भोंगा’ या चित्रपटाची  सर्वोत्तम चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केले असून मंदार नलिनी प्रोडक्शनची  निर्मिती आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि पर्पपल पेबल पिक्चर निर्मित ‘पाणी’ हा मराठी चित्रपट पर्यावरणावरील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास प्रत्येकी रजत कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये  पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.

‘नाळ’ : दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट
सुधाकर रेड्डी येंकटी दिग्दर्शित आणि मृदगंध फिल्म्स निर्मित ‘नाळ’ देशातील दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. स्वर्ण कमळ आणि 1 लाख 25 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्रीनिवास पोकळे आणि स्वानंद किरकिरे यांच्या अभिनयाचा सन्मान

'नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास  सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  सर्वोत्तम बालकलाकारासाठी यावर्षी चार बालकलाकारांची निवड झाली आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच प्रसिद्ध अभिनेते स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

 ‘तेंडल्या’ : सर्वोत्तम ऑडिओग्राफीचा मानकरी

‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम ऑडिओग्राफीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटात ध्वनीच्या माध्यमातून छोट्या शहराच्या वैविध्यपूर्ण रंगछटा दर्शविण्यात आल्या आहेत. लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट गौरव वर्मा यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नॉनफिचरमध्येही मराठीचा दबदबा                    
नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली  गौतम वझे दिग्दर्शित 'आई शप्पथ' या चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वर्णकमळ आणि 1 लाख 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘खरवस’ हा सर्वोत्तम लघु काल्पनिक चित्रपट ठरला आहे. आदित्य जांभळे यांनी चित्रपटाचे   दिग्दर्शन केले असून श्री महळसा प्रोडक्शन पोंडाची निर्मिती आहे.  प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे  स्वरूप आहे. केदार दिवेकर यांच्या संगीत दिग्दर्शनातील 'ज्योती'  चित्रपटाला सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.         

बॉलिवूडमधील चित्रपटास मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार:-

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून
 • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन-  कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
 • सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी
 • पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो
 • सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)
 • सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून

इतर काही राष्ट्रीय पुरस्कार:-

 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा- तेलुगू चित्रपट ‘महानटी’
 • सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- हेलारो
 • सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट ‘तारीख’
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्ती सुरेश (महानटी)
 • सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- तेलुगू चित्रपट ‘ऑ’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
 • सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- कन्नड चित्रपट ‘केजीएफ’

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »