विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र ने होणार सन्मान

विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र ने होणार सन्मान
विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांचा वीरचक्र ने होणार सन्मान

वर्धमान यांनी पाकिस्तानचे एफ १६ फायटर विमान पाडले होते

भारतीय हवाई दलातील विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते.

त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘विरचक्र’ पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे ‘हिंदुस्तान टाइम्स’ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा सरकारमार्फत करण्यात आलेली नाही.

वर्धमान यांची कामगिरी:-

  • भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात भारतीय हवाईदल आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या विमाने समोरासमोर आली. यावेळी अभिनंदन यांनी मिग २१ बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ १६ फायटर विमानावर वर आर- ७३ मिसाइल डागले.
  • या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग २१ बायसन विमानाला धडकले.
  • त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »