अभिषेकचा सुवर्णवेध

अभिषेकचा सुवर्णवेध
अभिषेकचा सुवर्णवेध

आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत घेतला सुवर्णवेध

 • भारताच्या अभिषेक वर्मा याने 'आयएसएसएफ' वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. अभिषेकचे हे वर्ल्डकपमधील दुसरे सुवर्ण ठरले.
 • एशियन गेम्समधील पदकविजेत्या अभिषेकने १० मी. एअर पिस्तूल प्रकारात २४४.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तुर्कीच्या इस्माईल केलेसने २४३.१ गुणांसह रौप्य, तर भारताच्या १७ वर्षीय सौरभ चौधरीने २२१.९ गुणांसह ब्राँझपदक मिळविले. 
 • अभिषेक आणि सौरभ यांनी यापूर्वीच या प्रकारातून ऑलिम्पिक कोटा निश्चित केला आहे. 
 • यासह पदकतक्त्यात भारत अव्वल स्थानावर पोचला असून, भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझ जमा आहे. गुरुवारी युवा नेमबाज इलावेनिल वालारिवनने १० मी. एअर रायफलमध्ये सुवर्ण, तर संजीव राजपूतने पुरुषांच्या ५० मी. रायफल थ्री पोझिशनमध्ये ऑलिम्पिक कोट्यासह रौप्यपदक मिळविले होते.
 • पहिल्या पाच शॉटअखेर अभिषेक ५०.५ गुणांसह दुसऱ्या, तर इस्माईल ५०.७ गुणांसह अव्वल स्थानावर होता, तर सौरभ ५०.४ गुणांसह पाचव्या कमांकावर होता. 
 • त्यानंतर दहाव्या शॉटअखेर अभिषेकने १०१.६ गुणांसह निसटती आघाडी मिळविली. सर्बियाचा डॅमिर माइकेच १०१.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. 
 • सौरभ १००.६ गुणांसह पाचव्या, तर इस्माईल १०१.१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता. त्यानंतर चौदा शॉटअखेरही अभिषेकने (१४२.४ गुण) आघाडी कायम राखली. तर सौरभने १४२.२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. 
 • सोळा शॉटअखेर सौरभची चौथ्या स्थानावर घसरण झाली. इस्माईलने दुसरे, तर युक्रेनचा ओलेह ओमेलचुक तिसऱ्या स्थानावर होता. सोळाव्या शॉटअखेर अभिषेक १६३.२ गुणांसह आघाडीवर होता. यानंतर अभिषेकने मागे वळून पाहिले नाही. त्याने आघाडी कायम ठेवत सु‌वर्णपदावर नाव कोरले, तर सौरभला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. चीनचा माजी जगज्जेता आणि ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या पँग वेइला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

दृष्टिक्षेप:-

 • अभिषेक वर्माचे हे या वर्षी वर्ल्डकपमध्ये मिळविलेले दुसरे सुवर्ण ठरले. यापूर्वी, एप्रिल २०१९मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये १० मी. एअर पिस्तूल प्रकारात अभिषेकने सुवर्णयश मिळविले होते.
 • सौरभ चौधरीने या वर्षी वर्ल्डकपमध्ये सहावे पदक पटकावले. यापूर्वी, सौरभने नवी दिल्ली आणि म्युनिकमधील वर्ल्डकपमध्ये १० मी. पिस्तूल आणि मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदके पटकावली होती; तसेच बीजिंगमधील वर्ल्डकपमध्ये मिश्र सांघिकमधील १० मी. एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पटकावले होते.
 • या वर्ल्डकपमध्ये भारताचे हे दुसरे सुवर्ण ठरले. यापूर्वी, गुरुवारी युवा नेमबाज इलावेनिल वालारिवनने १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्ण पटकावले होते.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »