भारतीय ननला संतपद

भारतीय ननला संतपद
भारतीय ननला संतपद

भारतीय नन मरियम थ्रेसिया आणि अन्य चौघांना संतपद बहाल

  • भारतीय नन मरियम थ्रेसिया आणि अन्य चौघांना पोप फ्रान्सिस यांनी येथील सेंट पीटर्स चौकात आयोजित शानदार समारंभात संतपद बहाल केले.
  • मरियम थ्रेसिया यांनी मे १९१४ मध्ये त्रिचूर येथे सिस्टर्स ऑप दि होली फॅमिली या गटाची स्थापना केली होती. मरियम थ्रेसिया यांच्याप्रमाणेच इंग्लिश कार्डिनल जॉन हेन्री न्यूमन, स्विस लेवुमन मार्गारेट बेज, ब्राझीलियन सिस्टर ड्युल्स लोपेज आणि इटालियन सिस्टर गुईजपिना व्हॅनिनी यांनाही संतपद प्रदान करण्यात आले.
  • संतपद प्रदान सोहळ्याला भारतीय शिष्टमंडळ आले होते. यामध्ये भारतीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन उपस्थित होते. यापूर्वी, २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत मरियम थ्रोसिया यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख केल्याचे मुरलीधरन यांनी सांगितले.
  • कोची येथील चर्चमध्ये मरियम थ्रेसिया यांना संतपद मिळाल्याप्रीत्यर्थ त्यांच्या मूर्तीला मुकुट घालण्यात आला.

व्हॅटिकन सिटी:-

  • व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे. व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे. व्हॅटिकनची लांबी केवळ १.०५ किमी व रुंदी ०.८५ किमी आहे. पोप हा व्हॅटिकनच्या सरकारचा प्रमुख आहे. बासिलिका ऑफ सेंट पीटर हे येथील प्रमुख चर्च आहे.
  • ख्रिश्चन धर्मीयांचे जगातील प्रबळ असे हे केंद्रस्थान! त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप तिथेच वास्तव्य करतात.
  • ‘व्हॅटिकन सिटी’ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली, त्याला फेब्रुवारी २०१९मध्ये ९० वर्षे पूर्ण झाली युरोपमधील हा व्हॅटिकन देश टायबर नदीच्या किनारी, व्हॅटिकन पहाडावर वसलेला आहे. रोमन कॅथॉलिक पंथाचे ते प्रमुख केंद्र आहे.
  • त्याला दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. विश्वविख्यात कलाकारांनी तिथे भव्यदिव्य वास्तू निर्माण केलेल्या आहेत.
  • त्यात अनेक चर्चेस, कलात्मक प्रासाद, संग्रहालये आणि पुस्तकालये आहेत. या स्वतंत्र, पण लहानग्या देशाचे क्षेत्रफळ अवघे ४४ हेक्टर (१०९ एकर) आहे आणि लोकसंख्या फक्त एक हजार.
  • अधिकृत भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. सन १९३०मध्ये ‘पोप’नी तिथे आपले चलन जारी केले. आर्थिक व्यवहार ‘युरो’मध्ये चालता

 

 

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »