त्या कोवळ्या फुलांचा हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन

त्या कोवळ्या फुलांचा हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन
त्या कोवळ्या फुलांचा हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन

त्या कोवळ्या फुलांचा हुंकार ऐकणारा गझलकार

'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' सारखी संवेदनशील गझल लिहीणाऱ्या कवी अनिल कांबळे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. ते ६६ वर्षांचे होते .त्यांच्या मागे पत्नी आरती व मुली प्रेरणा व प्रतिभा असा परिवार आहे. 

    अतिशय तरल, वास्तववादी आणि तितक्याच साध्या, सोप्या शब्दात आशय मांडणारे म्हणून कांबळे यांची महाराष्ट्रात ओळख होती. गझल प्रकारात सहजतेने त्यांनी मांडलेले विषय अनेकांनी गाण्यात रुपांतरीत केले. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेली आणि गायलेली त्यांची 'त्या कोवळ्या फुलांचा' ही गझल विशेष गाजली. कांबळे यांनी गझलेच्या प्रचार आणि प्रसाराच्या करीता आयुष्यभर काम केले. ते युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशनचे संस्थापक होते. तसेच अभिजात कला अकादमीचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळावर शोककळा पसरली आहे. 

त्यांच्या गाजलेल्या गझलेचा शेर:-

माणसे गेली तरी सावल्या उरतात मागे 

हे उन्हाचे खेळ सारे, का असे छळतात मागे 

याशिवाय त्यांची त्या कोवळ्या फुलांचा ही कविताही आवर्जून वाचावी अशीच आहे. 

त्या कोवळया फुलांचा बाजार पाहीला

पैशात भावनेचा व्यापार पाहीला मी

अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहीला मी

रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतू
वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहीला मी

थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहीला मी........

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »