मुर्मू काश्मीरचे तर माथूर लडाखचे नायब राज्यपाल

मुर्मू काश्मीरचे तर माथूर लडाखचे नायब राज्यपाल
मुर्मू काश्मीरचे तर माथूर लडाखचे नायब राज्यपाल

J&k आणि लडाखचे १ लेच नायब राज्यपाल

 • जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली करून गोव्याच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून केंद्राच्या विनियोग खात्याचे सचिव जी. सी. मुर्मू आणि लडाखच्या नायब राज्यपालपदी राधाकृष्ण माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्त होणारे मुर्मू आणि लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्त होणारे माथूर हे पहिलेच नायब राज्यपाल ठरले आहेत.
 • तर पी. एस. श्रीधरन यांना मिझोरामचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे.
 • केंद्रातील वित्त सचिव गिरीश चंद्र मुर्मू हे १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते विनियोग खात्याचे सचिव आहेत.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुर्मू त्यांचे प्रमुख सचिव होते. राधाकृष्ण माथूर यांना लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
 • जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही राज्य केंद्र शासित प्रदेश म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी अस्तित्वात येणार आहेत.
 • सत्यपाल मलिक यांनी यापूर्वी बिहारचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलं आहे.
 • २०१८ मध्ये काही महिन्यांसाठी त्यांच्याकडे ओडिशाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता.
 • १९८० ते ८६ आणि १९८६ ते १९९२ पर्यंत त्यांनी राज्यसभेत उत्तर प्रदेशचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
 • १९७४ ते १९७७ पर्यंत ते उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्यही होते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »