22 जुलैनंतर मराठवाडयात कृत्रिम पाऊस

22 जुलैनंतर मराठवाडयात कृत्रिम पाऊस
22 जुलैनंतर मराठवाडयात कृत्रिम पाऊस

मराठवाडयात कृत्रिम पाऊस

मराठवाड्यातील पीक परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान देण्यासाठी मराठवाड्यात 22 जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे, अशी माहिती रोजगार हमी योजनामंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. 
पावसाची प्रक्रिया पूर्ण :  कृत्रिम पावसाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 22 तारखेनंतर येणाऱ्या ढगांमध्ये पाण्याची घनता जास्त असेल. त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग निश्चित यशस्वी होऊ शकतो. 
पाऊस पाडण्यायोग्य ढग आल्यानंतर दोन छोटय़ा विमानांमार्फत ढगामध्ये सिल्व्हर आयोडाइड फवारले जाईल. त्यामुळे सर्वसाधारण जो पाऊस पडला असता त्याच्या 15 ते 25 टक्के जास्तीचा पाऊस होतो असा अनुभव आहे.
राज्य शासनाने धरणक्षेत्रावरील ढगांना प्राधान्य द्यावे अशा सूचना दिल्या आहेत. कूत्रिमरित्या पडलेला पाऊस धरण क्षेत्रात पडेल व ते पाणी किमान पिण्यासाठी उपलब्ध होईल. 
औरंगाबाद मधून होणार सुरुवात : पाऊस पाडण्यासाठी अमेरिकेतून मोठे विमान आणले जाणार आहे. त्यानंतर औरंगाबाद येथून कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा सज्ज होईल. अशीच यंत्रणा विदर्भातील नागपूर येथेही उपलब्ध केली जाणार आहे.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »