फायनलमध्ये चमकला बेस्ट कंडक्टरचा मुलगा

फायनलमध्ये चमकला बेस्ट कंडक्टरचा मुलगा
फायनलमध्ये चमकला बेस्ट कंडक्टरचा मुलगा

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने विजेतेपद पटकावले

Believe in yourself! Have faith in your abilities! Without a humble but reasonable confidence in your own powers you cannot be successful or happy.

  • १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने बांगलादेशला नमवत विजेतेपद पटकावले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात बेस्टच्या महिला वाहक वैदेही अंकोलेकर यांचा मुलगा आणि डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरचा सिंहाचा वाटा राहिला. अंतिम फेरीत अथर्वने चमकदार कामगिरी करत पाच बळी मिळवले.
  • अथर्वची कामगिरी स्वप्नवत होती अशी प्रतिक्रिया वैदेही अंकोलेकर यांनी दिली. भारतीयची फलंदाजी सुरू असताना मी बसमध्ये ड्युटीवर होते. त्यामुळे हा डाव पाहता आला नाही. तरिही अधूनमधून मोबाइलवर लाइव्ह अपडेट्स पाहत होते. 
  • अथर्व अवघ्या दोन धावा करून धावचित झाल्यामुळे मी काहीशी नाराज झाले होते असे वैदेही यांनी सांगितले. टीम इंडियाच्या गोलंदाजीच्या वेळी मात्र आपण घरी होतो. त्यामुळे मुलाची विजयी कामगिरी पाहता आल्याचे त्यांनी सांगितले. 
  • भारताने बांगलादेशला दिलेले १०७ धावांचे आव्हान माफक होते. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत विजय खेचून आणला आणि त्यातही अथर्वची कामगिरी महत्त्वाची होती. त्यामुळे खूपच आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया वैदेही यांनी व्यक्त केली. 
  • अथर्वच्या यशात सर्वांचाच वाटा असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. परिसरातील लोकांनी अथर्वला मदत केली. त्यामुळे त्यांचाही या यशात वाटा असल्याचे वैदेही यांनी सांगितले. अथर्वला परिस्थितीची जाणीव असून वडिलांनी घेतलेल्या कष्टाची त्याला जाणीव असल्याचे वैदेही यांनी सांगितले. अथर्वच्या स्वागताची जंगी तयारी सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
  • अथर्व १० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याची आई वैदेही यांनी खासगी शिकवणी घेत घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वैदेही या वाहक म्हणून बेस्टमध्ये रूजू झाल्या. तर, अथर्व रिझवी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »