वर्षभरात ७१ हजार ५४३ कोटींचे बँक घोटाळे

वर्षभरात ७१ हजार ५४३ कोटींचे बँक घोटाळे
वर्षभरात ७१ हजार ५४३ कोटींचे बँक घोटाळे

देशात गेल्या वर्षभरात बँक घोटाळ्यांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ

  • देशात गेल्या वर्षभरात बँक घोटाळ्यांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली असून घोटाळ्यांची रक्कम तब्बल ७३.८ टक्क्यांनी वाढून ती ७१ हजार ५४२.९३ कोटी इतकी झाली असल्याचे भारतीय रीझर्व बँकेच्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. 
  • २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँक घोटाळ्याची ५ हजार ९१६ प्रकरणे उघडकीस आली होती. यात घोटाळ्याची रक्कम ४१ हजार १६७.०४ कोटी रुपये इतकी होती. त्या तुलनेत २०१८-१९ या आर्थिक वर्षात घोटाळ्याची ६ हजार ८०१ प्रकरणं उघडकीस आली आणि या वर्षभरातील घोटाळ्यांची रक्कम ७१ हजार ५४२.९३ कोटी इतकी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये घोटाळ्याची प्रकरणं सर्वात जास्त असून त्यानंतर खासगी आणि विदेशी बँका असा क्रम आहे. घोटाळा झाल्यानंतर तो सरासरी २२ महिन्यांनंतर उघड झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट होते. गंभीर बाब म्हणजे १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला ती प्रकरणे तर सरासरी ५५ महिन्यांनंतर उघड झाली आहेत. 
  • दरम्यान, आरबीआयकडून हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. या अहवालात राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज, व्यवस्थापन याचं विश्लेषण केलं जातंच शिवाय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण अशा सूचनाही केल्या जातात.
     

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »