जसप्रीत बुमराह याने हॅट्रिक घेवून रचला इतिहास

जसप्रीत बुमराह याने हॅट्रिक घेवून रचला इतिहास
जसप्रीत बुमराह याने हॅट्रिक घेवून रचला इतिहास

कसोटी क्रिकेटमधील ही ४४ वी हॅट्‌‌ट्रिक

जसप्रीत बुमराहची हॅटट्रिक:-

  • बुमराहने नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्राव्होला राहुलकरवी झेलबाद केले, तर तिसऱ्या चेंडूवर शामारह ब्रुक्सला आणि पाचव्या चेंडूवर रॉस्टन चेसला पायचीत केले आणि कसोटी कारकीर्दीतील पहिलीवहिली हॅट्‌‌ट्रिक साजरी केली. 
  • कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्‌‌ट्रिक नोंदविणारा जसप्रीत बुमराह हा भारताचा तिसराच गोलंदाज ठरला. यापूर्वी, कराचीला फेब्रुवारी २००६मध्ये झालेल्या कसोटीत इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध, तर कोलकात्याला मार्च २००१मध्ये कसोटीत हरभजनसिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्‌‌ट्रिक नोंदविली होती. 
  • कसोटी क्रिकेटमधील ही ४४ वी हॅट्‌‌ट्रिक ठरली.
  • इंग्लंडकडून चौदा, ऑस्ट्रेलियाकडून अकरा, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्याकडून प्रत्येकी चार वेळा, भारताकडून तीन, बांगलादेश, श्रीलंका, न्यूझीलंड यांच्याकडून प्रत्येकी दोन वेळा हॅट्‌‌ट्रिक नोंदली गेली आहे; तसेच दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेकडून प्रत्येकी एकदा हॅट्‌‌ट्रिकची नोंद झाली आहे. 
  • २ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्‌‌ट्रिकची नोंद झाली. यापूर्वी, 'ओव्हल'वर जुलै २०१७मध्ये इंग्लंडच्या मोईन अलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅट्‌‌ट्रिक घेतली होती. 

जसप्रीत बुमराहची हॅटट्रिक, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारीची अर्धशतके यांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्हाइट वॉश देत निर्भेळ यश संपादन केले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विंडीजचा दुसरा डाव २१० धावांमध्ये गुंडाळत २५७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'मध्ये आपले खाते उघडले आहे. भारतीय संघाने आपला दुसरा डाव ४ गड्यांच्या मोबदल्यात १६८ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे विंडीजला विजयासाठी ४६८ धावांचा डोंगर पार करणे आवश्यक होते. पहिल्या डावाप्रमाणे वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावातही ढेपाळला.

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे विंडीज फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांचा दुसरा डाव २१० धावांवर आटोपला. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजने २ गडी बाद ४५ धावांपासून खेळण्यास पुढे सुरुवात केली. शॅमराह ब्रुक्स (५०) याचा अपवाद वगळता विंडीजचा एकही फलंदाज मैदानावर टिकाव धरू शकला नाही. भारतीय संघाकडून मोहम्मद शामी, रविंद्र जडेजा यांनी ३, इशांत शर्माने २, तर जसप्रीत बुमराहने १ गडी टिपला. यजमान वेस्ट इंडिजवर टी-२०, वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही व्हाईटवॉश स्विकारण्याची नामुष्की ओढावली. 

भारत वि. वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्याचे स्कोअरकार्ड:-

दरम्यान, विंडीजचा पहिला डाव ११७ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर फॉलोऑन देण्याऐवजी दुसऱ्या डावात फलंदाजी करणं भारताने पसंत केलं. दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मैदानात आलेला विराट कोहली भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीने सामन्याची सूत्र हाती घेतली. दोघांनीही अर्धशतकी खेळी साकारत भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. अजिंक्य रहाणेने नाबाद ६४ तर हनुमा विहारीने ५३ धावांची खेळी केली. यानंतर ४ गड्यांच्या मोबदल्यात १६८ धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. ही कसोटी मालिका 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' अंतर्गत खेळवण्यात आली. 

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »