देशात आता चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ

देशात आता चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ
देशात आता चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ

CDS तिन्ही दलांचं नेतृत्व करणारा अधिकारी

स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेसंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

  • देशात आता 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ' असेल आणि तिन्ही दलांचं नेतृत्व या अधिकाऱ्याकडे असेल.
  • या घोषणेने गेल्या अनेक वर्षांपासून विचाराधीन असलेली बाब पूर्णत्वास गेली आहे.
  • लष्करप्रमुख बिपीन रावत हे देशाचे पहिले 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ' असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
  • कारगिल युद्धानंतर उच्चस्तरिय समितीने 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) नियुक्त करण्याची शिफारस केली होती.
  • सीडीएस थेट संरक्षण मंत्र्यांना रीपोर्ट करेल, असेही त्यात नमूद करण्यात आले होते. २०१२ मध्ये नरेश चंद्र यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सनेही तिन्ही दलांचा एक प्रमुख असावा, अशी शिफारस केली होती. मात्र, त्यावर पुढे कार्यवाही झाली नव्हती.
  • सुरक्षा कर्मचारी ही आपली ताकद आहे आणि त्यांना आणखी बळ देण्यासाठीच मी आज लाल किल्ल्यावरून 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ' या पदाची घोषणा करत आहे.
  • या पदामुळे निश्चितच तिन्ही दलांना बळकटी मिळेल.
  • भारतात सध्या 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ कमिटी' आहे. यात तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असतो. यापैकी जो सर्वात वरिष्ठ असेल त्याच्याकडे समितीचं प्रमुखपद असतं. 
  • सध्या स्थलसेना प्रमुख बिपीन रावत, हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ तर नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह हे आहेत.
  • भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती तिन्ही दलांचे अध्यक्ष आहेत. आता 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ' होणाऱ्या अधिकाऱ्यावर तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी असणार आहे. 
  • 'चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ' हे पद ब्रिटन, श्रीलंका, इटली, फ्रान्स यासह किमान दहा देशांत आहे. यात आता भारताचा समावेश झाला आहे. सीडीएसचे अधिकार मात्र प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »