चांद्रयान २ आता चंद्रापासून चार पावलंच दूर'

चांद्रयान २ आता चंद्रापासून चार पावलंच दूर'
चांद्रयान २ आता चंद्रापासून चार पावलंच दूर'

सकाळी ९ वाजता चंद्राच्या कक्षेत झाला चांद्रयान २ चा प्रवेश

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलेले भारताचे 'चांद्रयान-२' आता चंद्रापासून केवळ चार पावले दूर आहे. २२ जुलैला मोहिमेवर निघालेले 'चांद्रयान-२' ७ सप्टेंबरच्या रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्रावर उतरेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

सकाळी ९ वाजता चंद्राच्या कक्षेत झाला चांद्रयान-२ चा प्रवेश:-

आज सकाळी ९ वाजता चांद्रयान-२चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्याची माहिती के. सिवन यांनी दिली. दरम्यानच्या काळात ३० मिनिटे जणू आमच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते, असे के. सिवन म्हणाले. सध्या चांद्रयान-२ चंद्राची परिक्रमा करत असल्याचेही ते म्हणाले. 

इस्रो करतेय अचूकपणे काम:-

चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिणी भागात उतरावे या दृष्टीने इस्रो अचूकतेवर काम करत असल्याचे सिवन म्हणाले. २८, ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला 'चांद्रयान-२' १८ हजार किलोमीटरच्य उंचीवरून ते १००/१०० किलोमीटरच्या उंचीपर्यंत आणण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली. 

२ सप्टेंबरला ऑर्बिटरपासून लँडर होईल वेगळे:-

२ सप्टेंबर या दिवशी ऑर्बिटर लँडरपासून वेगळे होईल. त्यानंतर इस्रो आपले सर्व लक्ष लँडरवर केंद्रित करेल. जसे आई-वडिलांच्या घरून निरोप घेऊन नव्या नवरीने सासरच्या घरी प्रवेश करावा तसाच हा 'चांद्रयान-२' चा प्रवेश असेल अशा शब्दात सिवन यांनी चांद्रयान-२ च्या प्रवेशाचे वर्णन केले आहे. 

चंद्राच्या दक्षिणी भागात उतरणार चांद्रयान-२:-

७ सप्टेंबर या दिवशी रात्री १.५५ वाजता पॉवर मिशन सुरू होईल. १५ मिनिटांनंतर २७ अंश दक्षिण आणि २२ अंश पूर्व चंद्राच्या दक्षिणी पृष्ठभागावर चांद्रयान- २ उतरेल. ३ तास १० मिनिटांनंतर सौर पॅनल रोव्हर काम करणे सुरू करेल. ३ तासांनंतर रोव्हर लँडरपासून वेगळे होईल. त्यानंतर ४ तासांनी रोव्हर चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरेल 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »