चंद्रदर्शन चांद्रयान २ ने पाठवला पहिला फोटो

चंद्रदर्शन चांद्रयान २ ने पाठवला पहिला फोटो
चंद्रदर्शन चांद्रयान २ ने पाठवला पहिला फोटो

अखेर चंद्रदर्शन

  • 'चांद्रयान-२'ला अखेर चंद्रदर्शन झालं असून चांद्रयानाने पाठवलेला पहिला फोटो 'इस्रो'ने ट्विटरवर शेअर केला आहे. 'चांद्रयान-२'च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागापासून २ हजार ६५० किलोमीटर अंतरावरून हा फोटो टिपला आहे. २१ ऑगस्ट रोजी हा फोटो टिपण्यात आल्याचेही पुढे नमूद करण्यात आले आहे. 
  • 'चांद्रयान-२'ने टिपलेले पृथ्वीचे फोटो इस्रोने ४ ऑगस्ट रोजी शेअर केले होते. त्यानंतर चांद्रयानाने टिपलेला चंद्राचा आकर्षक फोटो आज इस्रोने शेअर केला आहे. या फोटोत अपोलो विवरंही स्पष्टपणे दिसत आहेत.
  • दरम्यान, बुधवारी 'चांद्रयान-२'ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. मिशन फत्ते करण्यासाठी अजून १८ हजार किलोमीटर अंतर यानाला कापायचे आहे.
  • २० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात चांद्रयान-२ हे अंतर कापत चंद्राच्या चार कक्षा पार करणार आहे. 
  • या चार कक्षा पार केल्यानंतर पुढे केवळ १०० किलोमीटर अंतर उरणार आहे. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »