आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी अखेर चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी अखेर चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात
आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी अखेर चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

चिदंबरम आणि आयएनएक्स मीडिया घोटाळा

 • आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर २८ तासांनंतर ताब्यात घेण्यात आलं आहे. सीबीआय पथकाने तब्बल दीड तास चिदंबरम यांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं.
 • चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद ठेवण्यात आल्याने त्यावरून उड्या मारून सीबीआय टीम आत गेली व ही कारवाई करण्यात आली.
 • हा 'हायव्होल्टेज ड्रामा' सुरू असताना चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. 
 • चिदंबरम काँग्रेस मुख्यालयातून घरी गेल्याचे कळताच सीबीआयच्या पथकाने दिल्लीतील जोरबाग येथील त्यांचे निवासस्थान गाठले. मात्र चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गेटवरून उड्या मारून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तब्बल दीड तास चिदंबरम यांची चौकशी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू संघवीही उपस्थित होते.
 • चौकशी अंतिम टप्प्यात असताना सीबीआयने दिल्ली पोलिसांना घटनास्थळी बोलावले आणि जमावाला पांगवून चिदंबरम यांना ताब्यात घेतलं. तत्पूर्वी चिदंबरम यांनी काँग्रेस कार्यालयात त्यांच्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन स्वत:वरील आणि मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले. 
 • आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतंही आरोपपत्रं दाखल करण्यात आलेलं नाही. आम्हाला या घोटाळ्यात गोवलं गेलं आहे. आमच्यावरील सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनी कायद्याचं पालन करावं, असं चिदंबरम म्हणाले होते. हा खटला लढण्यासाठी वकिलांसोबत तयारी करत होतो. त्यामुळे तुमच्यासमोर येऊ शकलो नाही, असं स्पष्ट करतानाच आपल्याला फरार म्हटलं जात असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. 
 • स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशावेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अवघ्या सात मिनिटांच्या पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम काँग्रेस कार्यालयातून निघून थेट त्यांच्या घरी गेले होते.

काय आहे आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरण?

 • आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७मधील असून, त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती. 
 • शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जींची आयएनक्स मीडिया ही कंपनी आहे. 
 • चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. 
 • ३,५०० कोटी रुपयांचा एअरसेल-मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया प्रकरणात ३०५ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीत अनियमितता असल्याच्या प्रकरणात चिदंबरम यांचं नाव आल्याने ते चौकशी एजन्सीजच्या रडारावर आले होते 
 • आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता. 
 • त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती. 
 • आयएनएक्स मीडियाने आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. हे नियमबाह्य होते. त्यामुळे केवळ ४. ६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली. 
 • सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणात १५ मे २०१७ रोजी एफआयआर दाखल केली होती 
 • या तक्रारीत चिदंबरम यांच्यावर एफआयपीबीच्या गुंतवणूकीत अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. 
 •  यानंतर ईडीने २०१८ मध्ये या संबंधी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »