विक्रम लँडरशी २.१ कि.मी.वर संपर्क तुटला

विक्रम लँडरशी २.१ कि.मी.वर संपर्क तुटला
विक्रम लँडरशी २.१ कि.मी.वर संपर्क तुटला

इस्रो प्रमुख के सिवन यांना अश्रू अनावर

 • विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली. चांद्रयान-२ साठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागले होते. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता.
 • रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होतं. तसं सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता. 
 • इस्रो सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेऊन होते. एक वाजून ५३ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चांद्रयान अवघे २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.
 • जीवनात चढ-उतार येत असतात. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही विज्ञानाची आणि पर्यायाने देशाची सेवा केली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी खडतर मेहनत घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही यशस्वी कामगिरी केली आहे. धीर सोडू नका. संपर्क तुटला म्हणून खचून जाऊ नका. तुम्ही केलेले काम छोटे नाही. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो, असे सांगितले आहे. तुमच्या मेहनतीनेच पुन्हा एकदा देशाची मान उंचावेल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी के. सीवन यांची पाठ थोपटत त्यांनाही धीर दिला.

'इस्रो' प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर:-

 • 'इस्रो'च्या कंट्रोल रुममधून संपूर्ण देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित सर्व शास्रज्ञांचे कौतुक केल्यानंतर जेव्हा निरोपाचा प्रसंग आला तेव्हा इस्रो कंट्रोलरुममध्ये भावनांचे वेगळेच रुप पाहाचला मिळाले. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना भेटत असताना त्यांना जवळ घेत मिठी मारली. यावेळी सद्गदीत झालेल्या के. सिवन यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिवन यांचे सांत्वन केले. यावेळी सर्व शास्त्रज्ञ सद्गदीत झाले होते.
 • निश्चित संकेत प्राप्त होईपर्यंत ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. विक्रम लँडरकडे २.१ कि.मी. पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती 'इस्रो'कडून देण्यात आली.
 • आज सकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या कंट्रोल रुमला भेट देत देशाला उद्देशून भाषण केले. या वेळी त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले. मी इथे तुम्हाला उपदेश देण्यासाठी आलेलो नाही. आज सकाळी सकाळी तुमच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणूनच तुमचे मी दर्शन घेतले आहे. तुम्ही स्वत:च एक प्रेरणेचा सागर आहात. 
 • आम्ही सारे अमृताचे पुत्र आहोत, अमृताशी अमरत्व जोडलेले असते. अशा लोकांच्या पुढे अपयश कधीच नसते, आम्ही पुढे नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी शास्त्रज्ञांचा गौरव केला/
 • मी कालही म्हटले होते, आणि आजही म्हणतो की, मी तुमच्या सोबत आहे. देश देखील आपल्या सोबत आहे, भारतीय शास्त्रज्ञांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे, असे म्हणत मोदी यांनी उपस्थित सर्व शास्त्रज्ञांना धीर दिला.
 • भाषण संपल्यानंतर पंतप्रधान मोदी सर्व शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी कंट्रोल रुपमध्ये फिरले. प्रत्यकाच्या हाताशी हात देत मोदींनी सर्वांचे अभिनंदन, कौतुक करत धीर दिला.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »