तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंहांचं उड्डाण

तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंहांचं उड्डाण
तेजस लढाऊ विमानातून राजनाथ सिंहांचं उड्डाण

तेजसमधून उड्डाण करणारे देशातील पहिले संरक्षण मंत्री

 • शत्रूंना धूळ चारण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या 'तेजस' लढाऊ विमानातून आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केलं. 
 • तेजसमधून उड्डाण करणारे ते देशातील पहिले संरक्षण मंत्री आहेत. 
 • भारताचे तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) पाकिस्तान आणि चीनच्या लढाऊ विमानांपेक्षा वरचढ ठरत आहे. 
 • भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात याआधीच तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. डीआरडीओच्या अॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीनं तेजसचे डिझाइन केले आहे. 
 • हिंदुस्तान अॅरोनॉटिकल लिमिटेडने (एचएएल) या लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे.

अचूक निशाणा साधण्याची क्षमता:-

 • तेजसमध्ये निश्चित लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्याची क्षमता आहे. 
 • हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास हे लढाऊ विमान सक्षम आहे, असं एअर चीफ मार्शल धनोआ यांनी सांगितलं. 
 • अन्य लढाऊ विमानांच्या तुलनेत तेजस वजनानं हलका आहे. त्याचं वजन साधारण ६५६० किलो आहे. 
 • ५० हजार फूट उंचावर उड्डाण करू शकतं. त्याचे पंख ८.२ मीटर रुंद आहेत. तर लांबी १३.२ मीटर आणि उंची ४.४ मीटर आहे.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »