कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याची तयारी

कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याची तयारी
कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याची तयारी

गुरुनानक यांची ५५०वी जयंती

  • भारशी असलेल्या संबंधात तणाव असला, तरी कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याची; तसेच गुरुनानक यांची ५५०वी जयंती साजरी करण्यासाठी येणाऱ्या शीख भाविकांचे स्वागत करण्याची आमची तयारी असल्याचे पाकिस्तानने शुक्रवारी स्पष्ट केले. 
  • अफगाणिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते आणि खासदारांच्या शिष्टमंडळाशी बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी ही माहिती दिली. पाकिस्तान सरकारशी संवाद साधण्यासाठी अफगाणिस्तानचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये आले आहे. 
  • भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. हा निर्णय अंतर्गत बाब असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. 
  • 'भारताशी असलेल्या संबंधात तणाव असला, तरी कर्तारपूर कॉरिडॉर प्रकल्पात पुढे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. गुरुनानक यांची ५५० जयंती साजरी करण्यासाठी येणाऱ्या शीख भाविकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत,' असे कुरेशी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. 
  • पाकिस्तानातील कर्तारपूर येथील दरबार साहिब; तसेच भारतातील पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक यांना कर्तारपूर कॉरिडॉरद्वारा जोडले जाणार आहे. शीख यात्रेकरूंना व्हिसाशिवाय या कॉरिडॉरद्वारा पाकिस्तानात जाता येईल. त्यासाठी यात्रेकरूंना परमिट घ्यावे लागेल. कर्तारपूर येथील गुरुद्वाराची स्थापना गुरुनानक देव यांनी केली होती. 
  • दरम्यान, सध्याच्या तणावाचा परिणाम पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंधांवर होणार नसल्याचेही पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळाला सांगितले.
     

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »