खुल्या इंडो पॅसिफिक साठी कटिबद्ध

खुल्या इंडो पॅसिफिक साठी कटिबद्ध
खुल्या इंडो पॅसिफिक साठी कटिबद्ध

पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये भेट

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेचा आढावा घेतला आणि प्रादेशिक क्षेत्रामध्ये शांतता, समृद्धीसाठी द्विस्तरावरील सहकार्य वाढविण्याची कटिबद्धता दर्शवली.
 • पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. चीनने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात लष्करी आणि आर्थिक विस्तारवादाची भूमिका घेतली आहे.
 • दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये या क्षेत्रातील चीनच्या हालचालींसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.
 • चर्चेचा तपशील पूर्ण न सांगता परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे इंडो-पॅसिफिक क्षेत्र मुक्त आणि खुले ठेवण्यावर दोन्ही पंतप्रधानांनी कटिबद्धता दर्शवली.
 • परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'द्विस्तरावरील सहकार्य वाढविण्याबरोबरच प्रादेशिक पातळीवरील देशांशीदेखील सहकार्य वाढविण्याची कटिबद्धता दर्शवली.' भारत आणि जपानमध्ये 'टू प्लस टू' चर्चेवरही उभयतांत चर्चा झाली.
 • दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांमध्ये ही चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य त्यामुळे वाढीला लागणार आहे.
 • भारत आणि जपानमध्ये पुढील महिन्यात भारतामध्ये होणाऱ्या या वार्षिक परिषदेसाठी आबे यांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.

अतिरेक्यांविरुद्ध कारवाईसाठी सहकार्य:-

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्यानमारच्या परराष्ट्र सल्लागार आँग सान स्यू की यांची भेट घेतली. म्यानमारमधील अतिरेकी गटांविरुद्ध कारवाईसाठी भारताला सहकार्य करण्याचा मुद्दा प्रामुख्याने या वेळी उपस्थित करण्यात आला.
 • म्यानमारमधील राखीन प्रांतात सामाजिक-आर्थिक प्रकल्प भारताकडून राबविण्याची तयारीही मोदी यांनी दर्शवली. यापूर्वी या प्रांतात भारताकडून गृहप्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. बांगलादेशात झालेले विस्थापित लवकरच राखीन प्रांतात परततील, हेच प्रादेशिक हिताचे आहे, अशीही भूमिका भारताने मांडली.

चला थोडस सामान्य ज्ञान वाढवू…

जपान:-

 • जपान आशिया खंडातील एक महत्वाचा देश आहे. हा देश 4 मोठे व अनेक लहान बेटांचा मिळून बनला आहे. चीन, रशिया व कोरिया यासारखे बल्याढय देश Japan चे शेजारी देश आहेत. जपानी लोक त्यांच्या देशाला निप्पोन म्हणतात. याचा अर्थ होतो उगवत्या सूर्याचा देश.
 • Japan छोट्या मोठ्या 6852 बेटांचा मिळून बनला आहे. ह्या पैकी फक्त 340 बेटांचे क्षेत्रफळ 1 वर्ग किलोमीटर पेक्षा जास्त आहे.
 • 6852 बेटांपैकी फक्त 4 बेटांवर 97 टक्के जपान वसला आहे व बाकीच्या 6849 बेटांवर 3 टक्के जपान वसला आहे.  
 • जपान च्या तैसीरोजिम्मा नावाच्या बेटाला Cat Island अस म्हणले जाते कारण ह्या बेटावर 100 लोक राहतात परंतु 400 पेक्षा जास्त मांजर राहतात. ह्या बेटावर कुत्र्यांना न्यायला बंदी आहे.
 • जपान मध्ये वृद्ध लोकांची संख्या तुलनेने जास्त आहे तर भारतामध्ये 14-25 ह्या वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे.
 • जपान चा 70 टक्के हिस्सा पर्वतीय आहे, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत.
 • भारताचे क्षेत्रफळ Japan पेक्षा 18 पटीने जास्त आहे, तर लोकसंख्या 10 पटीने जास्त आहे.
 • जपानी लोकांचं सरासरी आयुष्यमान ८२ वर्षे इतके आहे, जगात सर्वात जास्त सरासरी आयुष्यमान असणारा हा देश आहे. जपान मध्ये १०० पेक्षा जास्त वय असणारे ५०००० लोक आहेत.
 • फॅमिली व्यवसाय चालवण्यासाठी जपान मध्ये तरुण मुलांना दत्तक घेतले जाते.
 • लोकसंख्येचा विचार करता जपानचा अकरावा क्रमांक लागतो.
 • जपानच्या एकूण  क्षेत्रफळाच्या 13 टक्के जागेवर शेती केली जाते तर भारतच्या एकूण  क्षेत्रफळाच्या 47 टक्के जागेवर शेती केली जाते.
 • फुगू माश्यापासून बनवलेले पदार्थ जपान मध्ये खूप प्रसिद्ध आहेत. हे पदार्थ फुगू नावाच्या विषारी माश्यापासून बनवले जातात. हे फार जोखमीचं काम आहे आणि फक्त परवानाधारक व्यति च हे काम करू शकतात. हा परवाना मिळवण्यासाठी 7-11 वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते.
 • Japan मध्ये फक्त जपानी भाषेमध्ये च शिक्षण दिले जाते. जपानी लोकांना त्याच्या मातृभाषेचा खूप अभिमान आहे.
 • Japan मध्ये मुलांना वयाच्या १० व्य वर्षापर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही.
 • जपान चा साक्षरता दर १००% आहे. जपानच्या  वृत्तपत्रांमध्ये दुर्घटना, राजकारण, वाद-विवाद ह्या विषयांवर बातम्या छापल्या जात नाहीत, फक्त आवश्यक असणाऱ्या गोष्टीच छापल्या जातात.
 • Sumo हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तसेच बेसबॉल सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर खेळाला जातो.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »