डॉ. मनमोहनसिंगांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली

डॉ. मनमोहनसिंगांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली
डॉ. मनमोहनसिंगांची ‘एसपीजी’ सुरक्षा काढली

मनमोहन सिंग यांना केवळ 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा मिळणार

 • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची 'एसपीजी' सुरक्षा व्यवस्था (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
 • यापुढे मनमोहन सिंग यांना केवळ 'झेड प्लस' दर्जाची सुरक्षा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला असलेल्या धोक्याच्या आधारावर कोणतीही सुरक्षा दिली जाते. 
 • सुरक्षा यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे त्यात वेळोवेळी आवश्यक तो बदल (वाढ किंवा कपात) करण्यात येतो. 
 • मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेतील कपात हा याच नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
 • 'एसपीजी' सुरक्षा काढण्याचा निर्णय तीन महिन्यांच्या अभ्यासानंतर घेण्यात आला आहे. 
 • विविध गुप्तचर यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मनमोहन सिंग यांनी २३ ऑगस्ट रोजी सहाव्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. 
 • राजस्थानच्या कोट्यातून काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे. भाजपने विरोधात उमेदवार न दिल्याने मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गांधी कुटुंबीयांना 'एसपीजी' सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. 
 • या यादीत डॉ. मनमोहन सिंग यांचेही नाव समाविष्ट होते. मात्र, ते आता काढण्यात आले आहे.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »