सुलभ व्यवसाय यादीत भारताचे स्थान उंचावले

सुलभ व्यवसाय यादीत भारताचे स्थान उंचावले
सुलभ व्यवसाय यादीत भारताचे स्थान उंचावले

भारताचे स्थान जागतिक बँकेच्या यादीत १४ ने उंचावत ७७ वरून ६३ पर्यंत पोहोचले

Ease of Doing Business Report-World Bank

 

  • सुलभ व्यवसाय वातावरणाबाबत भारताचे स्थान जागतिक बँकेच्या यादीत १४ ने उंचावत ७७ वरून ६३ पर्यंत पोहोचले आहे.

कश्यामुळे उंचावले स्थान??:-

  • नादारी आणि दिवाळखोरी संहिता, अप्रत्यक्ष करप्रणालीसारख्या आर्थिक सुधारणांमुळे देशाचे स्थान याबाबत सलग तिसऱ्यांदा उंचावले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

[मी मुद्दामच अहवालाचे काही snapshots टाकले आहेत, जेणेकरून अहवाल थोड्या-फार प्रमाणात तुमच्याही डोळ्याखालून जावा]

  • भारताप्रमाणे यादीत चीन (३१), सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवैत, ताजिकिस्तान, पाकिस्तान (१०८ वे स्थान) यांचा समावेश आहे.
  • खाली 190 देशांची पूर्ण लिस्ट दिली आहे, एकदा डोळ्याखालून घाला. पहिले पाच, शेवटचे तीन, आशियन देश, आपले शेजारी, ब्रिक्स देश आणि भारत यांचे Rankings महत्त्वाचे आहेत.
  • रिझव्‍‌र्ह बँक, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आदींमार्फत भारताच्या विकास दराचा चालू वित्त वर्षांसाठीचा अंदाज खाली आणला जात असतानाच(हे सर्व विकास दर लक्षात ठेवा) गुरुवारी जाहीर झालेल्या भारताच्या सुलभ व्यवसाय वाढत्या क्रमवारीचे उद्योग क्षेत्राने स्वागत केले आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलंड यंदाही अव्वल स्थानीच आहे.
  • तर सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, अमेरिका हे देश पहिल्या १० मध्ये राहिले आहेत.

मुंबई पालिकेचा उल्लेख”:-

  • मुंबई महापालिकेने राबविलेल्या ‘ऑनलाईन बांधकाम परवानग्यां’सह अन्य उपक्रमांनी बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे भारताला अन्य देशांच्या क्रमवारीत वरचे स्थान मिळविण्यात यश आले आहे.
  • जागतिक बँकेने याबाबत अहवालात पालिकेच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. प्रवीणसिंह परदेशी यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे.

स्थान उंचावलं:-

  • विविध १० प्रगती निर्देशांकांवर आधारित जागतिक बँकेच्या विविध १९० देशांच्या यादीत भारताचे सध्याचे स्थान ७७ व्या क्रमांकावर होते. ते आता १४ ने वर चढत ६३ वर पोहोचले आहे.

ब्रिक्स देश:-    
ब्राझील - 124
रशिया - 28
भारत - 63
चीन - 31
द. आफ्रिका – 84


भारताचे शेजारी:-
पाकिस्तान – 108
नेपाळ- 94
भूतान - 89
बांग्लादेश – 168


पहिले पाच:-
1)    न्यूझीलंड
2)    सिंगापुर  
3)    हाँग कोन्ग
4)    डेन्मार्क
5)    कोरिया
6)    इंग्लंड
(हाँग कोन्ग आणि डेन्मार्क दोन्ही देशांचा SCORE सारखा आहे)


शेवटचे पाच:-
सोमालिया-सर्वात खाली
एरिट्रीया-शेवटून दुसरे
व्हेनिझुएला-शेवटून तिसरे
(शेवटचे तीन लक्षात ठेवले तरी पुष्कळ)


{शेवटी १९० देशांची संपूर्ण लिस्ट दिली आहे please download the PDF to know in detail}

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »