मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त

  • राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
  • ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल पूर्ण झाला.

यू.पी.एस. मदान:-

  • राज्याचे मुख्य सचिव राहिलेले यू.पी.एस. मदान हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे. 
  • त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. 
  • मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »