इंडोनेशियाच्या पर्जन्यवनात आग

इंडोनेशियाच्या पर्जन्यवनात आग
इंडोनेशियाच्या पर्जन्यवनात आग

आग्नेय आशियातील शेकडो शाळा बंद ठेवण्याची आली वेळ

 • जगातील सर्वांत मोठ्या पर्जन्यवनांपैकी एक असलेल्या इंडोनेशियाच्या पर्जन्यवनात आग लागली असून, त्याचा विषारी धूर पसरत चालला आहे. यामुळे आग्नेय आशियातील शेकडो शाळा बंद ठेवण्यात आल्याचे समजले.
 • सुमात्रा आणि बोर्निओ बेटांवरील घनदाट जंगलात वारंवार आग लावली जाते. शेतीसाठी आणि पीक लागवडीसाठी बेटांवरील स्थानिक पुन्हा पुन्हा येथे जमीन साफ करतात. दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनच्या जंगलात नुकत्याच लावल्या गेलेल्या आगीमुळे जागतिक तापमानवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याचमुळे शेतजमीन उपलब्ध होण्यासाठी जंगलांत आग लावणे हा प्रकार गंभीर आहे.
 • इंडोनेशियात आगीचा धोका असलेल्या भागांची संख्या वाढली आहे. यात बोर्निओप्रमाणेच मलेशिया आणि ब्रुनेई या बेटांनाही धोका आहे. सरकारच्या वायू प्रदूषक निर्देशांकानुसार, क्वालालंपूर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील हवेचा दर्जा अनारोग्याकडे सरकत चालला आहे. यामुळे सिंगापूरवरदेखील दूषित हवेचे ढग जमा झाले आहेत.

 • अशा खराब हवेमुळे रहिवाशांना श्वसनाचे विकार जाणवायला लागले असून, डोळे चुरचुरणे व घसा दुखण्याचे त्रास सुरू झाले आहेत. बोर्निओ बेटावरील सारावाक राज्यातील नऊ जिल्ह्यांतील जवळपास ४०० शाळा मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या असून, दीड लाख विद्यार्थ्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचे स्थानिक शिक्षण विभागाने सांगितले आहे.
 • इंडोनेशियाच्या शेजारील सुमात्रा बेटावरील जांबी येथे पूर्वप्राथमिक शाळा शुक्रवारपर्यंत बंद राहणार असून, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. जांबीचे महापौर स्यारिफ फाशा यांनी रहिवाशांना चेहऱ्यावर मास्क लावण्यास सांगितले आहे.
 • मलेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या वतीने पाच लाख मास्क तयार करण्यात आले आहेत.
 • इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती दलाच्या म्हणण्यानुसार, या महिन्यातील चार दिवसांच्या कालावधीत आगीच्या ठिकाणांची संख्या सुमारे सातपट वाढून सहा हजार ३१२ झाली आहे.

इंडोनेशिया:-

 • इंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे.
 • बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत.  जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..
 • हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता. मात्र दुसर्‍या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
 • जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे.
 • येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
 • इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी जैविक विविधता आहे. आसियान व जी-२० ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.

A nation that destroys its soils destroys itself. Forests are the lungs of our land, purifying the air and giving fresh strength to our people.

-Franklin D. Roosevelt

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »