जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण

जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण
जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण

भारताचे विदारक सत्य

नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा वाईट स्थिती; ११७ देशांमध्ये १०२ वे स्थान, चीनचा २५ वा क्रमांक
जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये  भारताचा १०२ वा क्रमांक लागला असून २०१८ मध्ये तो ११७ देशांत ९५ व्या स्थानावर होता.
त्यामुळे आता नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे.
बेलारूस, युक्रेन, तुर्की, क्युबा व कुवेत या देशांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत (नंबर वन).
[खालील चित्रात सर्व देशांचे स्थान दिले गेले आहे-download PDF]
जागतिक भूक निर्देशांकाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.
हा अहवाल सादर कोणाकडून केला जातो ?:-
याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ (Concern Worldwide) ही आयरिश संस्था तसेच ‘वेल्ट हंगर हिल्फी/हाइल्फ’ (Welt Hunger Hilfe) ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे.
या अहवालात ४ प्रकारचे मापदंड (parameters) पाहिले जातात:-

  • संबंधित देशातील किती लोकसंख्या ही कुपोषित(undernourished) आहे.
  • ५ वर्षांखालील अशी किती मुले आहेत ज्यांची शारीरिक मानसिक वाढ आरोग्याला पोषक असताना-या आहाराअभावी होत नीट नाही आहे.
  • ५ वर्षांखालील अशी किती मुले आहेत ज्यांची शारीरिक उंची जितकी असायला हवी त्यापेक्षा कमी आहे.
  • अशी किती मुले आहेत ५ वर्षाच्या आताच मरण पावतात.
  • कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात. कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण २००८-२०१२ या काळात १६.५ टक्के होते ते २०१४-२०१८ या काळात २०.८ टक्के  झाले.
  • ६ ते २३ महिने वयोगटातील पुरेसे पोषण मिळणाऱ्या बालकांचे प्रमाण ९.६ टक्के होते. सगळ्या देशात भारतातील मुले वजनाच्या तुलनेत उंचीच्या निकषात मागे पडली असून त्यांचे प्रमाण २०.८ टक्के आहे.

 मागील काही वर्षाचे भारताचे स्थान:-
२०१६ – ९७ वे
२०१७ – १०० वे
२०१८ – १०३ वे
२००० मध्ये भारताचा ११३ देशात ८३ वा क्रमांक होता, तर आता ११७ देशात तो १०२ वा आहे. यातील भारताचे गुण २००५ मध्ये ३८.९ होते ते २०१० मध्ये ३२ झाले, नंतर २०१० मधील ३२ वरून ते २०१९ मध्ये ३०.३ झाले आहेत.
भारताचे विदारक सत्य:-


नेपाळ (७३), श्रीलंका (६६), बांगलादेश (८८), म्यानमार, (६९),  पाकिस्तान (९४) या देशांची स्थिती भूकेबाबतीत वाईट असली तरी ती भारताइतकी वाईट नाही.
चीनचा क्रमांक २५ वा लागला आहे.
पाच वर्षांखालील बालकांचा मृत्यू दर, वाढ खुंटणे, अपुरे अन्न मिळून कमी पोषण या निकषात भारताची कामगिरी सुधारली आहे.
हागणदारी मुक्तीत अपयश; आरोग्य धोक्यात:-
स्वच्छ भारत योजना भारताने लागू केली असली तरी अजून भारत देश हागणदारी मुक्त झालेला नाही. तेथे उघडय़ावर शौचास जाण्याची पद्धत सुरूच आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे, असे अहवालात म्हटले आहे.
भारताचा क्रमांक २०१० मध्ये ९५ वा होता आता तो १०२ आहे. ६ ते २३ वयोगटातील ९३ टक्के मुलांना पुरेसा आहार मिळत नाही हे यातून स्पष्ट झाले आहे.

ब्रिक्स देश:-
ब्राझील - १८ वे स्थान
रशिया - २२ वे स्थान
चीन - २५ वे स्थान
द. आफ्रीका - ६० वे स्थान
भारत - १०२ वे स्थान (सर्वात वाईट)


भारताचे शेजारी:-

नेपाळ ७३
बांग्लादेश ८८
पाकिस्तान ९४
भूतान - डेटा उपलब्ध नाही

[The following countries could not be included because of lack of data: Bahrain, Bhutan, Burundi, Comoros, the Democratic Republic of Congo, Equatorial Guinea, Eritrea, Libya, Moldova, Papua New Guinea, Qatar, Somalia, South Sudan, the Syrian Arab Republic, and Tajikistan.]


वैयक्तिक मत:-
हा निर्देशांक वाचून प्रचंड वेदना झाल्या. भारतातील लहान मुले अजूनही कुपोषित जगतात, शेवटी मृत्यूला कवटाळून प्राण सोडतात. हा निर्देशांक परीक्षेच्याच नाही तर आपल्या आयुष्याच्या  आणि समाजाप्रती आपल्या असणा-या कर्तव्याच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा आहे. सिस्टम मध्ये रिफॉर्म्स गरजेचे आहेतच, प्रश्नच नाही. पण आपण त्या सिस्टमचा भाग होऊन
रिफॉर्म्स करणे जास्त सोईस्कर आणि योग्य आहे, असे मला वाटते. मला जर कोणी कधी विचारले या या डिपार्टमेंडमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतो, पारदर्शकता कमी आहे (उदा: पोलीस डिपार्टमेंट, तलाठी इ) किंवा दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास भारताच्या राजकारणात लोकांची सेवा करण्याचा उद्देश्य नसतो. माझं उत्तर हेच असत की तुम्हाला जर कोणत्या गोष्टीबद्दल आक्षेप आहे, तर तुम्ही स्वत: त्या विभागात उतरून तेथील घाण काढणं गरजेचं आहे. ‘उपदेशाचे डोस फुकट देता येतात, कृतीला हिम्मतीची जोड लागते’. संत गाडगेबाबांनी इतरांना नाही सांगितले की, गटारांमधील घाण साफ करा ते स्वत: उतरले आणि त्यांनी साफ-सफाईचा वसा हाती घेतला.
मला माझ्या वैयक्तिक कृतीविषयी विचाराल तर मी समाजातील लहान मुलांच्या आहाराबाबत अतिशय संवेदनशील आणि जागरूक आहे. काही गोष्टी सांगायच्या नसतात, फक्त करायच्या असतात. दुसरे तुमच्यासाठी/समाजासाठी काय करतात, यावर तुमची करण्याची वृत्ते अवलंबून नसावी तुम्हीही तुमच्या परीने जमेल तितके नक्की करा.
- प्रियांका    

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »