जागतिक मंदीचे भारतात पडसाद IMF

जागतिक मंदीचे भारतात पडसाद IMF
जागतिक मंदीचे भारतात पडसाद IMF

जगातील 90% देशात आर्थिक वाढ कमी

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांचा आर्थिक विकासदराबाबत धोक्याचा इशारा
  • जगातील सर्वात मोठय़ा उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीसदृश स्थितीचे परिणाम दिसू लागल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिएव्हा यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या वर्षांत मंदीची झळ भारताला अधिक सोसावी लागण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
  • जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीसदृश स्थितीतून वाटचाल करीत असून त्यामुळे जगातील नव्वद टक्के देशांचा आर्थिक विकास दर कमी होणार असल्याचा धोक्याचा इशाराही त्यांनी दिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, जगात सध्या मंदीसदृश स्थिती असून या वर्षी आर्थिक विकास दर हा दशकाच्या आरंभापासून प्रथमच सर्वात कमी असेल. जागतिक आर्थिक स्थितीचा अहवाल पुढील आठवडय़ात जारी केला जाणार असून त्यात २०१९ व २०२० या वर्षांचा सुधारित अंदाज दिला जाणार आहे.
  • शुक्रवारी भारताच्या रिझव्‍‌र्ह बँकेने असे म्हटले होते की, आर्थिक विकास दर सध्याचे मंदीसदृश वातावरण बघता ६.९ टक्क्यांच्या आधीच्या अंदाजाइतका राहणार नाही तर तो ६.१ टक्के राहू शकतो. नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, पतधोरणाचा वापर हुशारीने करण्याची गरज असून आर्थिक स्थिरतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

जगाची स्थिती:-

  • २०१९ मध्ये जगातील नव्वद टक्के देशात आर्थिक वाढ कमी झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था मंदावल्याने अनेक देशांना फटका बसणार आहे.
  • ही घसरण चालू असताना ४० उदयोन्मुख बाजारपेठा व विकसनशील अर्थव्यवस्था यांचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपेक्षा अधिक राहणार आहे. त्यातील १९ देश आफ्रि केतील आहेत.
  • अमेरिका व जर्मनीत बेरोजगारी ऐतिहासिक नीचांकी आहे. अमेरिका, जपान व युरोपात तरीही आर्थिक उलाढाली मात्र मंदावल्या आहेत, असे जॉर्जिएव्हा म्हणाल्या.

भारताला झळ:-

  • भारत व ब्राझीलसारख्या मोठय़ा देशात या वर्षी मंदीसारखी परिस्थिती जास्त जाणवणार असून गेली अनेक वर्षे घोडदौड करणाऱ्या चीनच्या आर्थिक वाढीला लगाम बसणार आहे, असे जॉर्जिएव्हा यांनी नमूद केले आहे.

उजळणी : VISION STUDY वर जाऊन IMF पूर्ण REVISE करा

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »