वृक्षसंवर्धनाचा गोंदिया पॅटर्न राज्यभर

वृक्षसंवर्धनाचा गोंदिया पॅटर्न राज्यभर
वृक्षसंवर्धनाचा गोंदिया पॅटर्न राज्यभर

शेतबांधावरील वृक्षसंवर्धन मोहीम आता राज्यभर राबविण्यात येणार

#शिकण्यासारखे 

#Inspirational


गोंदिया जिल्ह्य़ात राबविलेली शेतबांधावरील वृक्षसंवर्धन मोहीम आता राज्यभर राबविण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्ह्य़ातील ग्रामस्थांनी उचलून धरलेली ही योजना राज्यात लागू करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

शेताच्या बांधावरची झाडे तोडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असंख्य अर्ज येत असत. या अर्जाना सरसकट परवानगी देण्याऐवजी काळे यांनी अशी झाडे तोडण्याची परवानगी मागणाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून या वृक्षांचे महत्त्व सांगितले. असे वृक्ष जगविले तर सरकारकडून अनुदान मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्याचा योग्य तो परिणाम झाला आणि अर्ज येणे कमी झाले.

शेताच्या बांधावर असलेल्या वृक्षांचे संवर्धन झाल्यास जमिनीची धूप कमी होते. वृक्षाच्या पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती होते तसेच प्राण्यांना अन्न मिळते, ही भूमिका कसोशीने मांडली. पुढे शेतबांधावरील वृक्षसंवर्धनाला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला.

पन्नास वर्षांपूर्वीचा अवाढव्य वृक्ष तोडून विकला तर एक रकमी दोन-चार हजार रुपये मिळतील. पण हेच झाड वाचविले तर दरवर्षी सरकार हजार रुपये देईल, असे शेतकऱ्यांच्या मनावर बिंबविण्यात काळे यशस्वी ठरले. काही झाडे एवढी मोठी असतात की त्यांच्या बुंध्यामध्ये एकाच वेळी किमान पाच-सहा माणसे सहज उभी राहू शकतात.

ही झाडे स्वार्थासाठी तोडणे योग्य नव्हे. अशी झाडे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शिवारात उभी आहेत तोपर्यंत दरवर्षी एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. चार पैशाच्या अडचणीसाठी जुने वृक्ष तोडले जाऊ  नये अशी यामागची भूमिका असून यात सप्तपर्णी, रेनट्री, निलगिरी तसेच मोह व सागाचे झाड वगळ्यात आले होते.

काळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीत वनसंरक्षक अशोक गिरीपुजे, उपवनसंरक्षक जयरामे गौडा, अरविंद मुंडे, एस. युवराज, कृषि संशोधक प्रताप चिपळूकर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे, हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांचा समावेश आहे. या योजनेची संप्रू्ण राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी शासनावर किती भार येईल, बांधावरील वृक्षांचे फायदे याबाबत अभ्यास करण्यासाठी विद्यापीठांमार्फत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, संशोधकांना शिष्यवृत्ती, विविध वृक्ष तसेच बांध्यावरील वृक्ष यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना आदी कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.

गोंदियाचा पन्नास टक्के भाग जंगलाखाली आहे. येथील नैसर्गिक संपत्तीमुळे वेगवगेळ्या पक्ष्यांची संख्याही मोठयम प्रमाणात असून हजार-पाचशे रुपयांसाठी झाडे तोडली जाऊ नये म्हणून ही योजना राबविण्यात आली आणि त्याला यश मिळाले. आता राज्यभर ही योजना मोहीम म्हणून राबविण्याचे शासनाने ठरविले आहे.


व्हिजन प्लॅटफॉर्मवरूनही आम्ही वेळोवेळी झाडांबाद्द्ल, पर्यावरणाबद्दल जागरूकता करतच असतो.
या सर्वातून एक प्रेरणा घ्या आणि पर्यावरणाच्या संवर्धनाला नक्की हातभार लावा. 

#adopt a tree

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »