डॉ विक्रम साराभाई यांना गुगलची आदरांजली

डॉ  विक्रम साराभाई यांना गुगलची आदरांजली
डॉ  विक्रम साराभाई यांना गुगलची आदरांजली

शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलच खास डुडल

भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक, 'इस्रो'चे संस्थापक दिवंगत शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांच्या घरीच झाले. आईने सुरू केलेल्या शाळेत ते शिकले. गुजरातमध्ये १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन नंतर ते इंग्लंडला रवाना झाले. केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते १९३९ साली रसायन आणि भौतिक या विषयातील परीक्षा उतीर्ण झाले. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्याने साराभाई भारतात परतले आणि त्यांनी बंगळुरू येथील ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी.वि.रमण यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्मिक किरणांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. 

देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत मोलाचा वाटा:-

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, विक्रम साराभाई स्पेस सेंटर... देशांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत विक्रम साराभाई यांचा मोलाचा वाटा होता.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘काॅस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्राॅपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले.

भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.

विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती.

आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली.

डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले.

त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी १९६२ साली शांती स्वरूप भटनागर पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांनी ३० डिसेंबर १९७१ ला  केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास घेतला. 
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »