कामिनी रॉय यांच्यावर गुगलचं खास डुडल

कामिनी रॉय यांच्यावर गुगलचं खास डुडल
कामिनी रॉय यांच्यावर गुगलचं खास डुडल

कामिनी रॉय यांची आज १५५ वी जयंती

  • बंगाली कवयित्रि, सामाजिक कार्यकर्त्या कामिनी रॉय यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल साकारून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
  • कामिनी रॉय यांचा जन्म १२ ऑक्टोबर १८६४ साली तत्कालीन बंगालच्या बाकेरगंज जिल्ह्यात (आता हा भाग बांगलादेशात आहे) झाला.
  • कामिनी रॉय यांची आज १५५ वी जयंती आहे. महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला होता.
  • महिलांच्या मतांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या महिलांमध्ये कामिनी रॉय यांचं नाव अग्रक्रमावर आहे. संभ्रांत कुटुंबात जन्मलेल्या कामिनी रॉय यांचे भाऊ कोलकाताचे महापौर होते. तसेच त्यांची एक बहीण नेपाळच्या शाही कुटुंबात फिजिशियन म्हणून नोकरीला होत्या.
  • महिलांना मतांचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता. त्याकाळी समाजाता फा मोठ्या प्रमाणात कुप्रथा होती.
  • कामिनी रॉय यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती. परंतु, पुढे त्यांनी संस्कृत या विषयात आपले शिक्षण पूर्ण केले. कोलकाता येथील बेथुन महाविद्यालयात त्यांनी आपले १८८६ साली बीएची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयात शिकवायला सुरुवात केली.
  • कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची अबला बोस या विद्यार्थिनीसोबत ओळख झाली. अबला या महिला शिक्षण आणि विधवा महिलांच्या कल्याणासाठी काम करत होत्या. त्यांच्या कामांवर प्रभावित होऊन कामिनी रॉय यांनी आपले आयुष्य महिलांच्या अधिकारासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. कामिनी रॉय यांनी इल्बर्ट विधेयकालाही पाठिंबा दिला.

इल्बर्ट विधेयक:-

  • व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात म्हणजेच १८८३ साली इल्बर्ट विधेयक आणले होते. या विधेयकामुळे भारतीय न्यायाधीशांना युरोपीय नागरिकसंबंधी प्रकरणावर सुनावणी करण्याचा अधिकार मिळाला. याचा युरोपिय समुदायाने विरोध केला होता, ‘इलबर्ट बिल‘ पास करून रिपनने मोठेच धाडस केले परंतु युरोपियनांच्या सामुहिक प्रतिकारामुळे ते अस्तित्वात येऊ शकले नव्हते परंतु, भारतीय लोकांनी याला पाठिंबा म्हणून आंदोलन सुरू केले. त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले.
  • १९०९ साली पती केदारनाथ रॉय यांच्या निधनानंतर कामिनी यांनी महिला समितीसोबत काम करणे सुरू केले. महिलांच्या हक्कासाठी त्यांनी स्वतःला संपूर्णपणे समाजकार्यात झोकून दिले. कामिनी रॉय यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले. तसेच तत्कालीन बंगालमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढली. अखेर १९२६ साली झालेल्या निवडणुकीत महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला. १९३३ साली त्यांचे निधन झाले.

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »