ज्येष्ठ लेखिका अमृता प्रीतम यांना गुगलची आदरांजली

ज्येष्ठ लेखिका अमृता प्रीतम यांना गुगलची आदरांजली
ज्येष्ठ लेखिका अमृता प्रीतम यांना गुगलची आदरांजली

भारतीय साहित्यातील एक लखलखीत नाव अमृता प्रीतम

  • भारतीय साहित्यातील एक लखलखीत नाव म्हणजे 'अमृता प्रीतम'.  
  • अष्टपैलू कवयित्री, लेखिका अमृता प्रीतम यांची आज १०० वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं खास डुडल साकारून त्यांना आदरांजली वाहिली आहे. 
  • अमृता प्रीतम यांनी पंजाबी व हिंदी भाषेत भरपूर लेखन केलं. त्यांच्या साहित्यात मुक्त व विचारी स्त्रीचा आवाज ऐकू येतो. मुख्य म्हणजे त्यांनी जीवनात तसेच लेखनात बंडखोरी केली व आलेले अनुभव विलक्षण प्रामाणिकपणे शब्दबद्ध केले.
  • त्यांचं लग्नापूर्वीचं नाव 'अमृता कौर' असं होतं, विवाहानंतर त्या अमृत प्रीतम झाल्या. त्यांचा विवाह सुमारे पंधरा वर्षे टिकला. विवाहविच्छेद झाला तरी त्यानंतरही त्या अमृता प्रीतम म्हणूनच ओळखल्या गेल्या. 
  • ३१ ऑगस्ट १९१९ मध्ये गुजरांवाला इथं अमृता यांचा जन्म झाला. भारतीय साहित्यविश्वाचा विचार केल्यास या साहित्यविश्वाला खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक उंचीवर नेण्याचं कार्य कोणी केलं असेल तर ते अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि तितकेच हिंदी वाङ्मयाला त्यांच्या साहित्यकृतींनी सौंदर्य प्रदान केलं आहे, सकस बनविलं आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »