हाशिम आमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

हाशिम आमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
हाशिम आमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हाशिम आमला

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हाशिम आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

काही दिवसांपूर्वीच आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती, त्यानंतर आफ्रिकेच्या आणखी एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्ती स्विकारली आहे. आमलाने आपला निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला कळवला आहे. दरम्यान, प्रथमश्रेणी क्रिकेट तसेच टी-२० लीगमध्ये आमला यापुढेही खेळणार आहे. 

नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत आमलाला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर फेकला गेला. या निराशाजनक कामगिरीनंतर आफ्रिकेच्या संघात सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. “माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मी अनेक गोष्टी शिकलो, नवीन मित्र बनवले आणि आफ्रिकेचा संघ ज्या लढाऊ बाण्यासाठी ओळखला जातो याचा मला कायम अभिमान राहिल.” हाशिम आमलाने निवृत्ती जाहीर करताना आपले विचार मांडले.

हाशिम आमला:-

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांमध्ये आमलाचं नाव घेतलं जातं. आमलाने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना १२४ कसोटी सामन्यांत ९ हजार २८२ धावा केल्या आहेत.
  • कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो दक्षिण आफ्रिकेचा एकमेव फलंदाज आहे. वनडेतही आमलाने आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केली.
  • १८१ वनडेत ८ हजार ११३ धावा आमलाच्या नावावर आहेत. आमलाने कसोटीत २८ आणि वनडेत २७ अशी मिळून ५५ शतके झळकावली. टी-२० क्रिकेटमध्येही त्याची बॅट तळपली.
  • ४४ टी-२० सामन्यांत त्याने १ हजार २७७ धावा केल्या.
  • १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत आमलाने ३४९ सामने खेळून १८ हजार धावा केल्या. 
  • ३६ वर्षीय आमलाने डिसेंबर २००४ मध्ये भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. २००८ मध्ये त्याने वनडेत पदार्पण केले होते. निवृत्तीचा निर्णय घेत असताना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचे आमलाने आभार मानले आहेत. 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »