हिमा दासचा सुवर्ण चौकार

हिमा दासचा सुवर्ण चौकार
हिमा दासचा सुवर्ण चौकार

पंधरा दिवसांच्या आतील चौथे सुवर्णपदक

भारताची स्टार धावपटू हिमा दास हिने बुधवारी चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टाबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. 
तिचे हे पंधरा दिवसांच्या आतील चौथे सुवर्णपदक ठरले.
हिमाने या स्पर्धेतील महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २३.२५ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. हिमाची प्रतिस्पर्धी व्ही. के. विस्मया हिने २३.४३ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. 
विस्मयाची ही या मोसमातील सर्वोत्तम वेळ ठरली. हिमाची २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी २३.१० सेकंद आहे. १९ वर्षीय हिमाचे हे २ जुलैपासूनचे चौथे सुवर्णपदक ठरले. 
युरोपात ती स्पर्धात्मक शर्यतीत प्रथमच सहभागी झाली होती. पहिल्या शर्यतीपासून तिने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. हिमाचा मुख्य प्रकार ४०० मीटरचा आहे. तिला अद्याप वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत २०० आणि ४०० मीटरसाठी पात्र ठरता आलेले नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरण्याची वेळ २०० मीटरमध्ये २३.०२ सेकंद असून, ४०० मीटरसाठी ५१.८० सेकंद आहे.
यानंतर पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महंमद अनासने ४५.४० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. टॉम नोह निर्मलने ४६.५९ सेकंद वेळ नोंदवून रौप्य, तर के. एस. जीवनने ४६.६० सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदकाची कमाई केली. वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत पात्र ठरण्याची वेळ ४५.३० सेकंद आहे.
हिमाचे सुवर्णयश
१. पोझनान अॅथलेटिक्स ग्रांप्रि स्पर्धा, पोलंड - २ जुलै - २०० मीटर - २३.६५ सेकंद
२. कुत्नो अॅथलेटिक्स स्पर्धा, पोलंड - ७ जुलै - २०० मीटर - २३.९७ सेकंद
३. क्लादनो अॅथलेटिक्स स्पर्धा, चेक प्रजासत्ताक - १३ जुलै - २०० मीटर - २३.४३ सेकंद
४. टाबोर अॅथलेटिक्स स्पर्धा, चेक प्रजासत्ताक - १७ जुलै - २०० मीटर - २३.२५ सेकंद

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »