रोहितचा हिटमॅन अवतार केला हा नवा विक्रम

रोहितचा हिटमॅन अवतार केला हा नवा विक्रम
रोहितचा हिटमॅन अवतार केला हा नवा विक्रम

एका मालिकेत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम त्याने रचला

 • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने भारताचा डाव सावरला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात खराब झाली.
 • सलामीवीर मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र रोहित शर्माने अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताचा डाव सावरला.
 • पहिल्या सामन्यात दोन शतके ठोकलेला रोहित दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला होता. पण रोहितने तिसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी करत पुन्हा आपले ‘हिटमॅन’ रूप दाखवून दिले.
 • जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आला. त्यानंतर आणखी षटकार ठोकत त्याने शतक झळकावले.
 • त्याने खेचलेला षटकार हा रोहितचा मालिकेतील १६ वा षटकार ठरला. त्याचसोबत एका मालिकेत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम त्याने रचला. या आधी विंडिजच्या शिमरॉन हेटमायरने बांगलादेशविरूद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १५ षटकार लगावले होते. तो विक्रम रोहितने मोडीत काढला.
 • याशिवाय, रोहितने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील बेन स्टोक्सचा १३ षटकारांचा विक्रमदेखील मोडला. या यादीमध्ये रोहित आणि स्टोक्सच्या पाठोपाठ मयांक अग्रवाल (८ षटकार) आणि रविंद्र जाडेजा (७ षटकार) हे फलंदाज आहेत.
 • दरम्यान, उपहारानंतरच्या सत्रात रोहितने आपलं अर्धशतक झळकावत भारताला शतकी धावसंख्येचा टप्पा गाठून दिला.
 • सुरुवातीचे ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांचा संयमाने सामना करत रोहित-अजिंक्यने भारतीय संघाला सावरले. या दरम्यान रोहितने आपल्या ठेवणीतले काही खास फटकेही खेळले.
 • उपहारापर्यंतच्या सत्रात रोहित शर्माने एक षटकार ठोकला होता. त्याचा हाच षटकार विक्रमी ठरला. त्यानंतर रोहित शर्माने दमदार षटकार लगावत शतकदेखील ठोकले.

जाणून घ्या हिटमन शर्माबद्दल:-

 • (एप्रिल ३०, १९८७, नागपूर, महाराष्ट्र - ) हा भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज असून अधूनमधून तोच उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.
 • तो इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स या संघात खेळतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ चार वेळेस इंडियन प्रीमियर लीगचा कप जिंकला आहे.
 • रोहितच्या नावावर आयपीयलमध्ये हँट्रिक आहे. त्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. २०१३ मध्ये त्याने भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली.

रोहितचे काही विक्रम:-

 • त्याने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केली. त्यातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या नोव्हेंबर २०१३ मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटीत १७७ धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत नाबाद १११ धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले.
 • २ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले. याच सामन्यात त्याने १६ षटकार मारले, व एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
 • त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध विश्वविक्रमी २६४ धावा करून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
 • रोहितने १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एक सलामीचा फलंदाज म्हणून भारताकडून सर्वात जलद ४००० धावा पूर्ण केल्या.
 • रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके केली आहेत आणि २०-२० मध्ये 4 शतके केली आहेत.
 • त्याने २०१७ डिसेंबरमध्ये श्रीलंका विरुद्ध टी २० मध्ये ३५ बाँल मध्ये जलद शतक ठोकणारा तो  जगात दुसरा क्रिकेटपटू ठरला.
 • रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यामध्ये तीन द्विशतक करणारा जगातील अव्वल खेळाडू आहे .

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »