गझला हाश्मी यांनी व्हर्जिनियाच्या सिनेटरपदाची निवडणूक जिंकून रचला इतिहास

गझला हाश्मी यांनी व्हर्जिनियाच्या सिनेटरपदाची निवडणूक जिंकून रचला इतिहास
गझला हाश्मी यांनी व्हर्जिनियाच्या सिनेटरपदाची निवडणूक जिंकून रचला इतिहास

व्हर्जिनियाच्या सिनेटर बनणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन मुस्लिम

 • अमेरिकेला जाण्याआधी हैदराबादमध्ये तिला सगळे मुन्नी म्हणून ओळखायचे. आज याच हैदराबादच्या मुन्नीने म्हणजे गझला हाश्मी यांनी व्हर्जिनियाच्या सिनेटरपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे.
 • गझला हाश्मी गेल्या ५० वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. व्हर्जिनियाच्या सिनेटर बनणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन मुस्लिम आहेत.
 • अमेरिकेच्या राजकारणात मुस्लिम महिलांचे प्रतिनिधीत्व वाढत असताना गझला हाश्मी यांनी ही निवडणूक जिंकली आहे. मागच्यावर्षी इल्हान उमर आणि राशिदा तलैब या दोन मुस्लिम महिलांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 • व्हर्जिनियामध्ये भारतीय, हिस्पॅनिक्स आणि कोरियन लोकांची मोठी संख्या आहे. इमिग्रेशन हा तिथे एक महत्वाचा मुद्दा आहे.
 • पूर्ण वेळ राजकारणात उतरण्यासाठी त्यांनी अलीकडेच आपली नोकरी सोडली. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे.
 • दुबईमध्ये राहणाऱ्या झफर अकबर यांनी गझला हाश्मी यांचे अभिनंदन केले आहे.
 • लहानपणीपासून मी मुन्नीला ओळखतो असे ते म्हणाले. झफर अकबर सुद्धा हैदराबादचे आहेत. या विजयावर बोलताना गझला हाश्मी यांनी हा माझा एकटीचा विजय नाही.
 • व्हर्जिनियामध्ये आपण बदल घडवू शकतो असे ज्यांना वाटते त्या सर्वांचा हा विजय आहे असे त्या म्हणाल्या. गझला यांनी जॉर्जिया विद्यापीठातून इंग्लिशमध्ये बीएची पदवी घेतली. हाश्मी यांचे पती अझर १९९१ साली रिचमाँड येथे स्थायिक झाले.

व्हर्जिनिया:-

 • व्हर्जिनिया (Virginia) हे अमेरिकेचे एक राज्य आहे.
 • अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले साउथ व्हर्जिनिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने बाराव्या क्रमांकाचे राज्य आहे.
 • व्हर्जिनियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला मेरीलँड व वॉशिंग्टन डी.सी., वायव्येला वेस्ट व्हर्जिनिया, पश्चिमेला केंटकी, नैऋत्येला टेनेसी व दक्षिणेला नॉर्थ कॅरोलिना ही राज्ये आहेत.
 • रिचमंड ही व्हर्जिनियाची राजधानी, व्हर्जिनिया बीच हे सर्वात मोठे शहर तर वॉशिंग्टन डी.सी. महानगर परिसरातील फेयफॅक्स काउंटी हा सर्वात मोठा उपविभाग आहे.
 • उत्तर व्हर्जिनियाची सीमा राष्ट्रीय राजधानी वॉशिंग्टन डी.सी.ला लागून असल्यामुळे ह्या भागात सी.आय.ए., सुरक्षा मंत्रालयाचे पेंटॅगॉन व इतर अनेक महत्वाच्या सरकारी संघटनांची मुख्यालये आहेत.
 • आर्थिक दृष्ट्या व्हर्जिनिया हे एक प्रगत राज्य असून येथील अर्थव्यवस्था बहुरंगी आहे.
 • कृषी, पर्यटन, सॉफ्टवेर सेवा इत्यादी येथील मोठे उद्योग आहेत. व्यापारासाठी सर्वोत्तम राज्य हा पुरस्कार गेली अनेक वर्षे व्हर्जिनियाला मिळाला आहे.

 

आता सिनेटर म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, तसेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक ही आता जवळ येत आहेत त्यानिमित्तानेच
अमेरिकेच्या राज्यपद्धतीवर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप:-

 • भारतीय राज्यघटनेप्रमाणेच अमेरिकेतही न्यायमंडळ, विधानमंडळ व कार्यकारी मंडळ आहेत. विधानमंडळ म्हणजे अमेरिकेतील काँग्रेस (संसद) कायदे तयार करते, कार्यकारी मंडळ (अध्यक्ष व त्याचे मंत्रीमंडळ) या कायद्यांची अंमलबजावणी करते तर न्यायमंडळ या कायद्यांचा अर्थ लावते.
 • अमेरिकेत दर दोन वर्षांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणारा मंगळवार हा निवडणुकीचा दिवस ठरलेला आहे.
 • अमेरिकेतील संसदेचे दोन सभागृह आहेत, सिनेट व हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह. या दोन्ही सभागृहांना मिळून काँग्रेस म्हणतात.
 • सिनेटच्या सदस्यांना सिनेटर, तर हाऊसच्या सदस्यांना रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणतात. या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना काँग्रेसमन किंवा काँग्रेसवुमन असेही म्हणतात.
 • प्रत्येक राज्यासाठी दोन सिनेटर या प्रमाणे ५० राज्यांचे १०० सिनेटर आहेत व त्यांची मुदत सहा वर्षांची असते. दर दोन वर्षांनी यातील एक तृतीयांश सदस्यांची मुदत संपते.
 • त्यामुळे दर दोन वर्षांनी या एक तृतीयांश जागांसाठीही मतदान होते. अमेरिकेचे उपाध्यक्ष सिनेटचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हच्या सदस्यांची मुदत दोन वर्षांसाठी असते.
 • लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण ४३५ भाग केले जातात त्यांना डिस्ट्रीक्ट म्हणतात व अशा प्रत्येक डिस्ट्रीक्टमधून एक सदस्य दर दोन वर्षांनी निवडले जातात.
 • बहुमत असणाऱ्या पक्षाचा प्रतिनिधी या सभागृहाचा अध्यक्ष असतो. या ४३५ सदस्यांशिवाय केंद्रशासित भागांसाठी सहा नियुक्त प्रतिनिधी असतात. त्यांना मतदानाचा अधिकार नसतो.
 • अमेरिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची मुदत चार वर्षांची असते. अध्यक्ष व उपाध्यक्ष ही संयुक्त उमेदवारी असते. त्यामुळे एकच मत अध्यक्ष व उपाध्यक्षाला मिळते. अध्यक्ष व उपाध्यक्ष हे अप्रत्यक्षरित्या (इलेक्टोरल कॉलेजमार्फत) थेट जनतेने निवडलेले असतात. त्यामुळे सिनेट किंवा हाऊसमध्ये कोणत्याही पक्षाचे बहुमत असले, तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष कायम राहतात.
 • अध्यक्षांना सिनेट व हाऊसने मंजूर केलेल्या विधेयकांवर नकाराधिकार (व्हेटो) दिला आहे. मात्र, एखादे विधेयक दोन्ही सभागृहांनी दोन तृतीयांश बहुमताने मंजूर केले, तर अध्यक्षांना त्याला मंजुरी द्यावीच लागते.
 • सिनेटर, उपाध्यक्ष अथवा इतर जागांसाठी कितीही वेळा पद भूषविता येते. परंतु घटनेने अध्यक्षाला केवळ दोन वेळाच अध्यक्ष होता येते. अशा तऱ्हेने दर दोन वर्षांनी हाऊसचे सगळे उमेदवार डिस्ट्रीक्टमधून, एक तृतीयांश सिनेटर राज्यांमधून तर अध्यक्ष व उपाध्यक्ष दर चार वर्षांनी संपूर्ण देशातून निवडले जातात. अध्यक्षाचे निधन झाले किंवा त्याने राजीनामा दिला, तर उपाध्यक्ष हा उर्वरित मुदतीसाठी अध्यक्ष होतो.
 • सिनेटर किंवा रिप्रेझेन्टेटिव्ह यासारख्या कारणांनी गेला तर काही राज्यांमध्ये ती जागा पुढील निवडणूक होईपर्यंत रिक्त ठेवली जाते. काही राज्यांमध्ये राज्यपालाला त्या जागेवर नेमण्याचे अधिकार आहेत आणि काही राज्यांत (५० पैकी १४) त्यासाठी निवडणूक घेतली जाते. त्यामुळे ठरलेल्या निवडणुकीशिवाय इतर वेळेला निवडणूक होत नाही. अशा रितीने दर दोन वर्षांनी निवडणूक यंत्रणा राबविली जाते.
 • पक्षांच्या अंतर्गत निवडणुकीतूनच अध्यक्षीय उमेदवार निवडला जातो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून आलेला उमेदवार, असे चित्र दिसून येत नाही.
 • पक्षाच्या एखाद्या सदस्यांना निवडणुकीसाठी उभे राहायचे आहे, त्यांनी आपली उमेदवारी घोषित केल्यानंतर जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर पक्षांतर्गत निवडणूक होते, त्याला प्रायमरी म्हणतात.
 • ही पद्धत अध्यक्ष, सिनेटर, हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह या सर्व पदांसाठी लागू आहे. त्यामुळे पक्षाने उमेदवार लादणे, हा प्रकार होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पक्षाच्या सदस्याला कोणत्याही कारणावरून पक्षातून काढता येत नाही.
 • अध्यक्ष व उपाध्यक्ष ही संयुक्त उमेदवारी आहे.
 • अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया ही एकंदरीतच किचकट आहे. यासाठी इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्यातील सिनेटरची संख्या (प्रत्येक राज्याचे दोन याप्रमाणे १००) व लोकसंख्येच्या प्रमाणात असलेल्या रिप्रेझेन्टेटिव्हची संख्या (एकूण ४३५) व डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबिया या केंद्रशासित प्रदेशाचे तीन याप्रमाणे एकूण ५३८ सदस्य यामध्ये आहेत.
 • प्रत्येक सिनेट किंवा रिप्रेझेन्टेटिव्हच्या मतदारसंघातून एक याप्रमाणे प्रत्येक पक्ष या कॉलेजचा सदस्य कोण राहील हे ठरवितो. निवडणूक होते त्या दिवशी प्रत्येक मतदार हा अध्यक्ष-उपाध्यक्षाला मत देतो.
 • राज्यातील लोकांच्या मतांनुसार ज्या उमेदवाराला लोकप्रिय मतांची आघाडी मिळाली आहे, त्या राज्यातील सर्व इलेक्टोरेल कॉलेजच्या सदस्यांची मते त्या उमेदवाराला मिळाली आहे, असे समजण्यात येते.
 • मात्र नेब्रास्का व मेन या राज्यांमध्ये लोकप्रिय मतांविरूद्ध हे सदस्य त्यांचे मत दुसऱ्या उमेदवाराला देऊ शकतात. जिंकण्यासाठी एकूण इलेक्टोरेल कॉलेजच्या ५३८ मतांपैकी किमान २७० मते मिळविणारा उमेदवार ही निवडणूक जिंकतो. लोकांच्या मतांची मोजणी मतदानाच्या दिवशी झाली, तरी अधिकृतपणे इलेक्टोरेल कॉलेजचे सदस्य निवडणुकीनंतर जेव्हा एकत्र येतात त्यावेळी त्यांची मते देतात.
 • त्याचवेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष अधिकृतरित्या जाहीर होतात. लोकप्रिय मतांनुसार या सदस्यांनी मत द्यायची असल्याने मतदानाच्या निकालानंतर लागलेल्या लोकप्रिय मतांच्यानुसार विजयी उमेदवार संभाव्य विजेता म्हणून समजला जाऊ शकतो.
 • दुसरी प्रक्रिया आहे मतपत्रिका व त्याच्या मोजणीची. प्रत्येक राज्याला दिलेली व राज्याने काऊंटीला दिलेल्या स्वायत्ततेमुळे ही पद्धतही गुंतागुंतीची आहे. यामुळे प्रत्येक काउंटी आपली मतपत्रिका कशी असावी व त्याची मोजणी कशी असावी, हे ठरवू शकतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील मतप‌ित्रका असल्या, तरी त्यात घोळ होऊ शकतो.
 • प्रत्येक काउंटीगणिक मोजण्याची पद्धत वेगळी असू आहे. यामुळे निवडणूक झाल्यावर मतमोजणी लगेचच चालू झाली, तरी अधिकृत निकाल यायला कितीही वेळ लागू शकतो. सन २००० च्या अध्यक्षीय निवडणुकीत फ्लोरिडा राज्यातून लोकप्रिय मतांमध्ये अल गोअर व जॉर्ज बुश यांच्यात कोणी बाजी मारली, हे शेवटपर्यंत समजू शकले नाही. त्यानिमित्त झालेल्या खटल्यामध्ये न्यायालयाने ‘ही निवडणूक कोण जिंकले, हे आम्ही सांगू शकत नाही, पण कोण हरले हे सांगू शकतो,’ असे सांगून बुश यांना विजयी ठरविले.
 • पण एक मात्र नक्की आहे, की तिथली पद्धत तुमच्यावर विश्वास ठेवते व जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकते. जर कोणी सत्याने वागला नाही किंवा खोटे मतदान केले तर त्यावर कडक शिक्षा होते.
 • प्रत्येक अमेरिकन नागरिकाला, तो परदेशात असला तरीही ई-मेलने न चुकता मतपत्रिका येते. ती प्रिंट करून, सही करून पोस्टाने पाठविण्याची जबाबदारी मतदाराची असते. यावर ओळख सांगण्यासाठी अन्य कागदपत्रे जोडावे लागत नाहीत.

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »