मध्य प्रदेशात सुरु होतेय देशातली पहिली टाइम बँक

मध्य प्रदेशात सुरु होतेय देशातली पहिली टाइम बँक
मध्य प्रदेशात सुरु होतेय देशातली पहिली टाइम बँक

येथे देवाणघेवाण होणार ती सत्कर्मी लावलेल्या वेळेची

  • मध्य प्रदेशात देशातली पहिली 'टाइम बँक' सुरू होणार आहे. ही बँक रुढार्थाने आपल्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या बँकेसारखी बँक नव्हे.
  • येथे देवाणघेवाण होणार ती वेळेची, किंबहुना सत्कर्मी लाव लेल्या वेळेची. या टाइम बँकेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही स्वेच्छिक सेवा द्या आणि त्या बदल्यात तुमच्या खात्यात तितकेच तास जमा केले जातील, ज्यांचा उपयोग तुम्ही अशाच कुठल्या अन्य प्रकारच्या सेवेसाठीही करू शकाल.
  • राज्य सरकारच्या अध्यात्म विभागाने शुक्रवारी हा आदेश जारी केला. अपर मुख्य सचिव मनोज श्रीवास्तव यांनी सांगितलं की या संबंधी सर्व जिल्हा कलेक्टरांना यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
  • या योजनेचा उद्देश लोकांमध्ये एकमेकांप्रति सेवाभाव वाढवणे आहे. कोणी एखाद्या गरजवंताची जितकी मदत करेल तितके तास त्याच्या खात्यात जमा होतील. जेव्हा त्याला कधी मदतीची गरज असेल तेव्हा याच जमा तासांच्या मदतीने त्याला टाइम बँक नेटवर्कमधून अन्य कुणाची मदत मिळेल.
  • उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची काळजी घेत आहात किंवा गरीब मुलांना शिकवत आहात तर त्याबदल्यात तुमच्या खात्यात काही तास जमा होतील.

हा थोडासा वेगळा प्रकल्प आहे तुम्हाला या प्रकल्पाबाद्दल नक्की काय वाटते हे जाणून घेण्यास आम्हाला नक्की आवडेल.

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »