कांडला बंदरावरील सुरक्षा वाढविली

कांडला बंदरावरील सुरक्षा वाढविली
कांडला बंदरावरील सुरक्षा वाढविली

कांडला आणि मुंद्रा बंदर

  • कांडला आणि मुंद्रा बंदर, तसेच गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था गुरुवारी वाढविण्यात आली.
  • समुद्रमार्गाने पाकिस्तानी दहशतवादी कच्छमध्ये घुसण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
  • सागरी मार्गाने दहशतवादी हल्ल्याचा इशारा नौदलाने काही दिवसांपूर्वीच दिला होता.

मुंद्रा बंदर:-

  • मुंद्रा बंदर हे अदानी ग्रुपकडून चालविण्यात येते.
  • देशातील सर्वांत मोठ्या बंदरांपैकी ते एक आहे.

कांडला बंदर:-

  • कांडला बंदर सरकारकडून चालविले जाते. 
  • ही दोन्ही बंदरे कच्छमध्ये आहेत. पाकिस्तानची सागरी सीमेपासून जवळ ही बंदरे आहेत.
  • 'दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती आम्हाला वेळोवेळी दिली जाते. त्यानुसार कच्छ जिल्ह्यातील कांडला बंदरासह महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. १५ ऑगस्टपूर्वीच सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गुजरातमध्ये दहशतवादी शिरल्याची नेमकी माहिती नाही. पण सागरी मार्गाने दहशतवादी घुसू शकतात असे सर्वसाधारणपणे सांगण्यात आले आहे,' अशी माहिती पोलिस महानिरीक्षक (सीमा भाग) डी. बी. वाघेला यांनी सांगितले.
  • 'सागरी मार्गाने घुसखोरी होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार पोलिस आणि अन्य सुरक्षा जवानांनी गस्त वाढविली आहे. मरीन पोलिसही या कामात सहभागी झाले आहेत,' अशी माहिती अंजारचे उप पोलिस अधीक्षक धनंजय वाघेला यांनी सांगितले.

तसेच गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था गुरुवारी वाढविण्यात आली

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »